Consumer Court Fined IRCTC : रेल्‍वेगाडी ३ घंटे उशिराने धावल्‍याने रेल्‍वेला ७ सहस्र रुपयांचा दंड !

प्रत्‍येक प्रवाशाने अशा प्रकारे तक्रार करणे आवश्‍यक आहे. त्‍यातून तरी रेल्‍वे प्रशासनाला जाग येईल आणि गाड्या वेळेवर धावू लागतील !

छत्रपती संभाजीनगर येथे सव्वा ३ लाख ग्राहकांची वीज कायमस्वरूपी तोडली !

छत्रपती संभाजीनगर आणि जालना या २ जिल्ह्यांतील एकूण सव्वातीन लाख घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आदी वीज ग्राहकांनी वीजदेयक भरलेले नाही. यामुळे त्यांची वीज कायमस्वरूपी तोडण्यात आली आहे.

ऑनलाईन औषधाची विक्री करणार्‍या आस्थापनाकडून ग्राहकाला मिळणार १ लाख रुपयांची हानीभरपाई !

औषधासारख्या नागरिकांच्या जीवनाशी निगडित असलेल्या उत्पादनांविषयी जाब देणार्‍यांनी आवश्यक ती दक्षता घेतली नाही, तसेच औषधांचा अपेक्षित असलेला दर्जा सांभाळला नाही, असे निकालात नमूद आहे.

Consumer Protection : गोवा : राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने विमा आस्थापनाची आव्हान याचिका फेटाळली

बजाज अलायन्स या विमा आस्थापनाने सदर शॅक हा उपाहारगृहापेक्षा तात्पुरता बांधलेला शॅक’, असा युक्तीवाद करून विम्याची रक्कम नाकारली होती !

१ एप्रिलपासून नवीन वीजदर लागू होण्‍याची शक्‍यता

वीज ग्राहक आणि औद्योगिक संघटना यांच्‍या राज्‍यस्‍तरीय समन्‍वय समितीसह विविध वीज ग्राहक आणि सामाजिक संघटना यांनी प्रस्‍तावित दरवाढीला कडाडून विरोध केला आहे.

उबेर इंडिया आस्थापनाला २० सहस्र रुपये देण्याचे आदेश !

एका महिलेला विमानतळावर पोचण्यास विलंब झाल्याने उबेर इंडिया आस्थापनाला २० सहस्र रुपये देण्याचे आदेश मुंबईतील ग्राहक न्यायालयाने दिले आहेत.

दहा रुपयांची फसवणूक केल्यामुळे ग्राहकाला १५ सहस्र रुपये देण्याचा जिल्हा ग्राहक मंच (सिंधुदुर्ग)चा वीज वितरणला आदेश

वीज वितरण आस्थापनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात यशस्वी लढा देणारे ओरोस येथील विष्णुप्रसाद दळवी यांचे अभिनंदन ! ग्राहकांना विविध कारणांनी वेठीस धरणार्‍या वीज वितरण आस्थापनाला हा मोठा धक्का आहे !

‘मटर पनीर’ऐवजी ‘चिकन करी’चे पार्सल पाठवल्याने हॉटेलला द्यावी लागणार २० सहस्र रुपये हानीभरपाई !

एका हिंदु शाकाहारी कुटुंबाने ‘जीवाजी क्लब’ नावाच्या हॉटेलमधून शाकाहारी पदार्थ मागवला असतांना त्यांना ‘झोमॅटो’ या घरपोच अन्न पोचवणार्‍या आस्थापनाकडून मांसाहारी जेवण मिळाले. हे पाहून त्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला, तसेच त्यांना अन्नग्रहण करता आले नाही.

शेतीमालांवर ५ टक्के वस्तू आणि सेवा कर लावल्याने किंमती वाढणार !

केंद्र सरकारने पॅकिंग (बांधणी) केलेल्या आणि लेबल (नाव) लावलेल्या सर्व खाद्यपदार्थांवर, तसेच शेतीमालावर ५ टक्के जी.एस्.टी. (वस्तू आणि सेवा कर) लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे महागाई वाढणार आहे. त्याचा परिणाम सामान्य ग्राहकांवर होणार आहे, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.