श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचे प्रकरण पडताळून कार्यवाही करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले निवेदन

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचार

मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण बंद करणार्‍या शासकीय अधिकार्‍यांना बडतर्फ करावे, तसेच मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍या दोषींवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या (‘सीआयडी’च्या) अहवालानुसार गुन्हे नोंद करण्यात यावेत, या मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट आणि छत्तीसगड या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. या वेळी मुख्यमंत्र्यांसमवेत शिवसेनेचे पक्ष प्रतोद भरतशेठ गोगावले, माजी मंत्री महादेव जानकर हेही उपस्थित होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील सर्व माहिती पडताळून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देतांना (डावीकडे) श्री. सुनील घनवट आणि उजवीकडून आमदार महादेव जानकर आणि आमदार भरतशेठ गोगावले

या वेळी खासगी ट्रॅव्हल्सचे स्थानिक तिकीट विक्रेते, तसेच संकेतस्थळावरील नियमबाह्य भरमसाठ तिकीटदर नियंत्रित करण्यात यावेत, या मागण्यांचेही निवेदन देण्यात आले. याविषयी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून पुढील कार्यवाही करण्याच्या संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या. या वेळी समितीचे श्री. सतीश सोनार हेही उपस्थित होते.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेली निवेदने –


हे ही वाचा –

‘तुळजापूर फाइल्स’ !
https://sanatanprabhat.org/marathi/640407.html

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील अपहार प्रकरणातील दोषींना शिक्षा कधी होणार ?
https://sanatanprabhat.org/marathi/585355.html