Polluted Smart City Panjim : ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे होत असलेले धूळप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना चालू !

न्यायाधीश पहाणी करणार म्हणून कामे करणारे आस्थापन उपाययोजनांच्या नावाखाली दिखाऊपणा करत आहे, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ? संबंधित आस्थापनांनी या उपाययोजना आधीच केल्या असत्या, तर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला नसता !

Goa Temple Theft : दुर्भाट येथील श्री साई मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवली !

चोरट्यांनी दानपेटी डोंगरावर नेऊन फोडली आणि आतील नाणी वगळता सर्व नोटा पळवल्या. मंदिराचे पुजारी त्यांच्या गावी गेल्याने आणि मंदिरात कुणी नसल्याची माहिती चोरट्यांना असल्याने त्यांनी ही चोरी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Delhi Liquor Scam : ‘ईडी’कडून गोव्यातील आप नेत्यांसह चौघांची चौकशी

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कह्यात घेतल्यानंतर न्यायालयात त्यांच्या जामीनअर्जाला विरोध करतांना ‘ईडी’ने देहली मद्य धोरण घोटाळ्यातील रक्कम आम आदमी पक्षाने वर्ष २०२२ मध्ये गोव्यातील विधानसभा निवडणुकीत वापरल्याचे म्हटले होते.

Goa Drugs Racket : गोवा – ‘अपना घर’मधील मुलाने धमकी दिल्याची महिला अधिवक्त्यांची पोलीस ठाण्यात तक्रार !

गोवा सरकारच्या ‘अपना घर’मधील मुलांकडे अमली पदार्थ आढळल्याच्या तक्रारी आहेत, तसेच ‘अपना घर’मधील कर्मचार्‍यांनी या प्रकरणी संबंधितांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. ‘अपना घर’मध्ये मुलांचे पुनर्वसन होत नसल्याचे हे दर्शक ! हे प्रशासनाला लज्जास्पद !

Cyber Attack Vedic Clock : ‘विक्रमादित्य वैदिक घड्याळ्या’च्या अ‍ॅपवर सायबर आक्रमण

यामुळे या घडाळ्याची प्रक्रिया मंदावली आहे. वेळ सांगतांना चुका होतांना दिसत आहेत.

महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फडणवीस यांचा माझ्यावर आक्रमण करण्याचा डाव ! – मनोज जरांगे पाटील, आंदोलनकर्ते

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझ्यावर आक्रमण करण्याचा डाव आखला होता. हा प्रयोग छत्रपती संभाजीनगरमध्येच होणार होता

Chhattisgarh Mass Tribal Conversion : बेमेतरा (छत्तीसगड) येथे आदिवासी समाजातील २५ हून अधिक जणांचे धर्मांतर

छत्तीसगडमध्ये आता भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे सरकारने हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कठोर कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

जरांगे पाटील यांची एस्.आय.टी. चौकशी झाली पाहिजे ! – प्रवीण दरेकर, विधान परिषदेचे गटनेते

मनोज जरांगे यांनी विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर आरोप केले. त्याची चौकशी झाली पाहिजे.

मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे यांच्या वक्तव्यांचे ‘विशेष अन्वेषण समिती’द्वारे अन्वेषण करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीची भाषा ही अतिशय चुकीची आहे.आंदोलनांच्या वेळी येणारे जेसीबी कुणाचे ? ते कोणत्या कारखान्यांतून येतात ? त्यांच्यामागे कोण आहे ? पैसा कुठून येतो ? याची विशेष अन्वेषण समिती नेमून अन्वेषण झाले पाहिजे.

संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची तात्काळ ‘सीआयडी’ चौकशी करा ! – बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चा

विश्‍वस्त मंडळ विसर्जित करून प्रशासक नेमण्यापूर्वी ज्या भाविकांनी दागिने दान म्हणून दिले, त्यांच्या नोंदी नाहीत, तसेच देवस्थानाकडे नेमक्या किती भूमी आहेत ? याच्याही नोंदी नाहीत. त्यामुळे ज्या विश्‍वस्तांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांची चौकशी झालीच पाहिजे. याच समवेत त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचीही चौकशी झाली पाहिजे.