राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि आतंकवादविरोधी पथक करत आहेत अन्वेषण
नवी देहली : राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि आतंकवादविरोधी पथक यांना उत्तरप्रदेशातील झाशी आणि कानपूर येथे रेल्वेगाड्या रुळांवरून घसरवण्यामागच्या कटामागे मदरशांचा संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. इस्लामी कट्टरतावादी आणि आतंकवादी ऑनलाईन माध्यमांचा वापर करून मुसलमान तरुणांचा बुद्धीभेद करून त्यांचा देशविरोधी कारवायांमध्ये वापर करून घेत आहेत. त्यांचा मदरशांशीही संबंध आहे. हे शोधण्यासाठी या यंत्रणा अनेक ठिकाणी धाडी टाकत आहेत. तसेच यामागील विदेशी निधीचे स्रोतही शोधले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर २ दिवसांपूर्वी झाशी येथे धाड टाकून मदरसा शिक्षक मुफ्ती खालिद नदवी याची १८ घंटे चौकशी करण्यात आली. या वेळी स्थानिक मुसलमानांनी विशेषतः महिलांनी नदवी याची यंत्रणांच्या अधिकार्यांच्या कह्यातून सुटका केली होती; मात्र नंतर त्याला पुन्हा पकडण्यात आले. चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले.
१. गेल्या ३ मासांमध्ये साबरमती एक्सप्रेस आणि कानलिडी एक्सप्रेस या महत्त्वाच्या गाड्या झाशी आणि कानपूर यांच्या आसपास रुळावरून घसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘वन्दे भारत’ या गाडीवर येथे दगडफेक करण्यात आली.
२. ऑनलाईन माध्यमातून धार्मिक शिक्षण देणार्या अनेक लोकांचे व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यात अनुयायांना रेल्वेगाड्या रुळांवरून घसरवण्यासाठी चिथावण्यात आले आहे. अन्वेषण यंत्रणा आता अशा लोकांचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकायातून जिहादी आतंकवाद केवळ गोळीबार आणि बाँबस्फोट यांपुरताच मर्यादित राहिलेला नसून अशा प्रकारच्या कारवाया करून भारताची हानी करण्याचा प्रयत्नही केला जात आहे. यामुळे आता देशात मदरशांवर बंदी घालण्याची मागणी करणे आवश्यक झाले आहे. या बंदीसाठी हिंदूंनी संघटित होऊन सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे ! |