राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या चौकशीत झाले उघड !
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या गांदरबल येथे बोगद्याच्या कामामधील कामगारांवर झालेल्या जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणामध्ये आतंकवाद्यांना स्थानिक मुसलमानांनी साहाय्य केल्याची माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केलेल्या चौकशीत मिळाली आहे. स्थानिक मुसलमानांच्या पाठिंब्यामुळे आतंकवाद्यांना आक्रमण करून पळून जाण्यासाठी वाहन मिळाले. आक्रमणापूर्वी गुप्तपणे माहिती काढण्यात आली होती. कामगारांच्या छावणीमध्ये तैनात असलेल्या रक्षकांकडे शस्त्रे नसल्याची ठोस माहिती आतंकवाद्यांकडे होती, असे चौकशीत आढळून आले आहे.
२० ऑक्टोबरच्या रात्री आतंकवाद्यांनी गांदरबलच्या गगनगीर भागात केलेल्या आक्रमणात एक डॉक्टर आणि ६ कामगार ठार झाले होते. या आक्रमणाचे दायित्व लष्कर-ए-तोयबाच्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या संघटनेने घेतले आहे.
संपादकीय भूमिका
|