आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरील बंदीत ३१ जुलैपर्यंत वाढ

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरील बंदीत ३१ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ‘ही बंदी १५ जुलैपर्यंत असेल’, असे सांगण्यात आले होते; मात्र त्यात आता ३१ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

पाकमधील ३० टक्के वैमानिकांकडे बनावट परवाना ! – पाक सरकारनेच दिली माहिती

पाकमधील ३० टक्के वैमानिकांकडे विमान उड्डाणासाठी लागणारा परवाना बनावट आहे, अशी माहिती पाकच्या सरकारनेच दिली. काही दिवसांपूर्वी कराचीमध्ये विमान अपघात झाला होता.

कोल्हापूर-मुंबई आणि कोल्हापूर-तिरुपती विमानसेवेला १ जुलैपासून प्रारंभ

कोल्हापूर-मुंबई आणि कोल्हापूर-तिरुपती विमानसेवेला १ जुलैपासून प्रारंभ होत आहे. गेल्या ३ मासांपासून दळणवळण बंदीमुळे ही सेवा बंद होती.

शबरीमला येथे विमानतळ उभारण्यास केरळमधील साम्यवादी सरकारची मान्यता  

केरळच्या साम्यवादी सरकारने येणार्‍या निवडणुकीवर डोळा ठेवून हिंदूंची मते मिळवण्यासाठी दाखवले गाजर ! साम्यवादी सरकारला जर हिंदूंविषयी आत्मियता असेल, तर त्याने शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना दर्शन मिळण्याच्या सूत्राला दिलेले समर्थन मागे घेऊन हिंदूंना आश्‍वस्त करावे !

विमानातील मधल्या आसनावरून प्रवास करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची सशर्त अनुमती

दळणवळण बंदीच्या कालावधीत नागरी विमान महानिर्देशालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करून विमानातील मधल्या आसनावरून प्रवास करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे.

भारत सैनिकांच्या हौतात्म्याचा सूड उगवू शकतो, या भीतीने पाकच्या लढाऊ विमानांची आकाशात गस्त

काश्मीरच्या हंदवाडा येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात भारताचे कर्नल, मेजर आणि अन्य सैनिक हुतात्मा झाल्याचा सूड भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करून घेऊ शकतो,

आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर १४ एप्रिलपर्यंत बंदी

केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत देशभरात दळणवळण बंदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवरही १४ एप्रिलपर्यंत बंदी घातली आहे. यापूर्वी ही बंदी ३१ मार्चपर्यंत घालण्यात आली होती. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. केवळ मालवाहू विमानांचे उड्डाण चालू ठेवले जाणार आहे.