ध्वनीप्रदूषण करणारे भोंगे हटवा ! – विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

ध्वनीप्रदूषण करणारे भोंगे हटवण्यात यावेत, या मागणीचे निवेदन विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांना देण्यात आले.

कोल्हापूर महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती !

कोल्हापूर महानगरपालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर या दिवशी संपली. यामुळे महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘हिंदु धर्मात दोन लग्न करतात का ?’ – महिला तलाठी सय्यद, तारळे (जिल्हा सातारा)

प्रशासकीय कामात धर्म कुठून आला ? अर्ज स्वीकारून त्यावर योग्य उत्तर द्यायचे सोडून धर्मभावना दुखावणार्‍या या घटनेला कुणी ‘प्रशासकीय जिहाद’ म्हटल्यास चूक ते काय ? अशा प्रशासकीय अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !

प्रसारमाध्यमांनी गोव्याची प्रतिमा जगासमोर सकारात्मक मांडावी ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन

प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत असलेल्या तथ्यहीन आणि संदर्भहीन बातम्यांमुळे गोव्यातील पर्यटन आणि इतर व्यवसाय यांवर विपरीत परिणाम होत आहे.

कर्नाटकात मराठा समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

कर्नाटकात मराठा समाज महामंडळासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

वीज कर्मचार्‍यांनी घेतला संप मागे !

दळणवळण बंदी काळापासून अद्यापर्यंत वीज कर्मचारी प्राणांची पर्वा न करता काम करत आहेत. शासनाने इतर विभागातील कर्मचार्‍यांना दीपावलीनिमित्त सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर केले; मात्र वीज कर्मचार्‍यांना यापासून वंचित ठेवले.

सातारा येथे रात्री १२ वाजल्यानंतर पोलिसांकडून तपासणी

कोरोनामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चोर्‍यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

कृषी विधेयकाचा मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांना लाभ ! – पृथ्वीराज चव्हाण

मोदी शासनाने घाईगडबडीत ३ शेतकरी विरोधी विधेयके संसदेत संमत करून लोकशाहीचा गळा घोटला आहे.=पृथ्वीराज चव्हाण

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍याला कोरोनाची लागण

जिल्हा रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांची तपासणी करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍याचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे.

देशात तिहेरी तलाकच्या घटनांमध्ये ८२ टक्के घट ! – केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची माहिती

‘इतिहासात १ ऑगस्ट या दिवसाची नोंद ‘मुस्लिम महिला अधिकार दिवस’ म्हणून झाली आहे. देशात ‘मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा’ अस्तित्वात आल्यापासून तिहेरी तलाकच्या घटनांमध्ये ८२ टक्के घट झाली असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली.