सातारा येथे रात्री १२ वाजल्यानंतर पोलिसांकडून तपासणी

सातारा, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – दीपावलीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा येथे रात्री १२ वाजल्यानंतर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. वाहनांचा क्रमांक, कागदपत्रांची पडताळणी, चालकाचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक यांची नोंद करून घेतली जात आहे.

कोरोनामुळे सध्या चोर्‍यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील आठवड्यात ५ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामुळे सातारा पोलीस दलाने बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे दुचाकी आणि चारचाकी वाहनांची कसून तपासणी चालू केली आहे. बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथील पोलीस चौकीकडून यापूर्वी तपासणी केली जात होती; मात्र त्यात सातत्य नव्हते.