कृषी विधेयकाचा मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांना लाभ ! – पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण

कराड, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – मोदी शासनाने घाईगडबडीत ३ शेतकरी विरोधी विधेयके संसदेत संमत करून लोकशाहीचा गळा घोटला आहे. ही विधेयके शेतकर्‍यांना गुलामगिरीत लोटणारी असून मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा लाभ होणार आहे, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने शेतकरी बचाओ व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. चव्हाण यांनी कोल्हापूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेला संबोधित केले. ते पुढे म्हणाले की, केंद्रशासनाने किमान आपल्या मित्रपक्षांशी या विधेयकांविषयी चर्चा करायला हवी होती. मंत्रीमंडळ बैठकीतही याविषयी चर्चा केली नाही. वर्ष २०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्‍वासन देणारे केंद्रशासन शेतीमालाला हमीभावही देत नाही. हा काळा कायदा पुन्हा सरकारला पाठवून फेरविचार करण्याची मागणी आम्ही आज राज्यपालांकडे केली आहे.