ध्वनीप्रदूषण करणारे भोंगे हटवा ! – विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ (उजवीकडे) यांना निवेदन देतांना विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते

बेळगाव – शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी मशिदींवर ध्वनीक्षेपक लावण्यात आलेले आहेत. ध्वनीप्रदूषणासमवेत धार्मिक कारणांसाठी याचा गैरवापर होत आहे. तरी ध्वनीप्रदूषण करणारे भोंगे हटवण्यात यावेत, या मागणीचे निवेदन विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांना १७ नोव्हेंबर या दिवशी देण्यात आले. या वेळी बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. भावकाण्णा लोहार आणि विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष श्री. विजय जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.