सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍याला कोरोनाची लागण

सिंधुदुर्ग – जिल्हा रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांची तपासणी करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍याचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे. गणेशोत्सवामुळे बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी दिसू लागली असून त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.