कोल्हापूर महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती !

आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे

कोल्हापूर, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – कोल्हापूर महानगरपालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर या दिवशी संपली. यामुळे महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार १६ नोव्हेंबर या दिवशी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी महापालिकेच्या प्रशासकपदाचा पदभार स्वीकारला. त्यामुळे १६ नोव्हेंबरपासून कोल्हापूर महापालिकेवर प्रशासक राजवट चालू झाली आहे.