कर्नाटकात मराठा समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

येडियुरप्पा

बेळगाव – महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन चालू आहे, तर कर्नाटकात मराठा समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी घेतला आहे. या महामंडळासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.