स्वधर्मात बहुपत्नीत्वासारख्या प्रथा पाळणार्यांना हिंदु धर्मातील विवाह संस्काराविषयी बोलण्याचा काय अधिकार ?
सातारा – तलाठी असलेल्या एका मुसलमान महिलेकडून एका हिंदु विधवा महिलेस अपमानास्पद वागणूक मिळण्याची घटना पाटण तालुक्यातील तारळे येथे घडली आहे. खबालवाडी येथील रेणुका यशवंत जाधव या वारस नोंद अर्ज प्रविष्ट करण्यासाठी तारळे येथील तलाठी कार्यालयात सकाळी गेल्या होत्या; मात्र त्यांना महिला तलाठी सय्यद यांनी दुपारी ३ वाजेपर्यंत कार्यालयाबाहेर थांबवले. त्यानंतर रेणुका जाधव यांना महिला तलाठी सय्यद यांनी ‘हिंदु धर्मात दोन लग्न करतात का ?’, असा अपमानास्पद प्रश्न विचारला. तसेच ‘वारस नोंद अर्ज प्रविष्ट करता येणार नाही’, असे सांगितले.
या वेळी महिला तलाठी सय्यद यांनी ‘वारस नोंद अर्ज का घेता येत नाही ?’, याचे कारण स्पष्ट केले नाही. याविषयी रेणुका जाधव यांनी पाटणचे प्रभारी तहसीलदार थोरात यांना दिल्यानंतर त्यांनीही महिला तलाठी सय्यद यांना पाठीशी घालण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला. वास्तविक वारस नोंद प्रकरणात काही त्रुटी असल्यास किंवा अन्य काही विषय असल्यास तसे नमूद करून तलाठी हा अर्ज निकाली काढू शकल्या असत्या; परंतु तसे न करता त्यांनी रेणुका जाधव यांना धार्मिक प्रश्न विचारून त्यांचा अपमान केला आहे. याविषयी न्याय मिळण्यासाठी रेणुका जाधव यांनी विनाविलंब सातारा जिल्हाधिकार्यांकडे तक्रार अर्ज प्रविष्ट केला आहे. (प्रशासकीय कामात धर्म कुठून आला ? अर्ज स्वीकारून त्यावर योग्य उत्तर द्यायचे सोडून धर्मभावना दुखावणार्या या घटनेला कुणी ‘प्रशासकीय जिहाद’ म्हटल्यास चूक ते काय ? अशा प्रशासकीय अधिकार्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)