पारंपरिक गरबा नृत्य, त्याचे महत्त्व आणि लाभ अन् आधुनिकतेच्या नावाखाली सध्या केल्या जाणार्या गरबा नृत्याने होणारी हानी !
सध्या पारंपरिक पद्धतीने सात्त्विक पोशाख घालून गरबा खेळला जात नाही. लोक मनात येईल, तसे नृत्य करतात. ते एका लयीत नृत्य करत नाहीत. प्रत्येक जण आपापल्या नृत्यमुद्रा दाखवण्यासाठी विचित्र नृत्य करतो. कोणी पारंपरिक नृत्य केले, तर ‘जुनाट पद्धत’ म्हणून त्यांना हसतात.