‘हर हर महादेव’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा ऐकू येणार !
देशभरात ३.२५ लाख तिकिटांची विक्री !
कोल्हापूर, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत विकी कौशल यांची प्रमुख भूमिका असलेला हिंदी भाषिक चित्रपट ‘छावा’ शुक्रवार, १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात ‘छावा’चे आकर्षण पहायला मिळत असून ‘बॉक्स ऑफीस’वर तो गेल्या काही महिन्यांतील सर्वाधिक आगाऊ तिकीट विक्री होणारा चित्रपट ठरत आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात या चित्रपटाची आगाऊ ३ लाख २५ सहस्र तिकीट विक्री झाली आहे. कोल्हापूर येथे पहिल्यांदाच ‘आयनॉक्स’ या चित्रपटागृहात सकाळी ६.३० पासून खेळ लावले असून उद्या दिवसभरात होणार्या २० खेळांची तिकीटविक्री झालेली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी प्रसंगी मृत्यू पत्करला; मात्र धर्मपरिवर्तन केले नाही. अशा छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र संपूर्ण देशभरात या निमित्ताने पोचण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
१४ फेब्रुवारी हा कथित ‘व्हॅलेंटाईन’ दिवस नाही’, तर ‘धर्मासाठी प्राणत्याग करणारे छत्रपती संभाजी महाराज आमचे आदर्श आहेत’, हेच उद्या तरुणाई ठणकावून सांगेल आणि चित्रपटगृहांमध्ये ‘हर हर महादेव’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणा घुमतील ! |
संपादकीय भूमिका :धर्मासाठी बलीदान करणार्या छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श युवकांनी समोर ठेवला, तर हिंदु राष्ट्र दूर नाही ! |