आधुनिकतेच्या नावाखाली हिंदु व्यक्ती आणि हिंदु कुटुंब यांनी स्वत:ला विसरून जाऊ नये. साधेपणा आणि संयम ही हिंदु घरांची ओळख असावी. खरेतर आपण जपानची प्रशंसा करतो. त्यांनी घराची व्यवस्था प्रत्येक प्रकारे जपून ठेवली आहे. तेथे कोणताही कामावर गेलेला माणूस घरी येतो, तेव्हा तो ‘घरगुती’ कपडे घालतो. जपानमध्ये एकमेकांना जपानी पद्धतीने अभिवादन केले जाते. त्यांची संवाद साधण्याची भाषा जपानी आहे. मुलांना जपानी भाषेतच शिक्षण दिले जाते.
विशेषत: शहरी भागात आपल्या हिंदु कुटुंबांना पाश्चात्त्यांच्या विकृत अंधानुकरणाची सवय का लागली आहे ? संसार का मोडले जात आहेत ? अनुभूती देणार्या स्वत्वाकडे डोळेझाक आणि मानसिक दास्यत्वाचे जोखड हीच ‘हिंदु घर’ डळमळीत होण्याची प्रमुख कारणे असल्याचे दिसते.’
(साभार : ‘हिंदू घर’, प्रकाशक – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ७.१०.२०००)