
प्रयागराज – आज धर्मरक्षणाचे कार्य करणार्या संघटना निवडकच आहेत; त्यात हिंदु जनजागृती समितीचे कार्य पुष्कळ चांगले आहे. आज धर्मांतर झालेल्यांचे शुद्धीकरण करण्याची पुष्कळ आवश्यकता आहे, असे वक्तव्य सोमयाजी षष्ठ पीठाधीश्वर गोस्वामी वल्लभरायजी महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला, तसेच त्यांना समितीच्या राष्ट्र-धर्म रक्षणाच्या कार्याची माहिती दिली.