सर्व शाळा-महाविद्यालयांत हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाचा विषय पोचवतो ! – शिक्षणाधिकारी आर्.डी. शिंदे, जत

आपली महान भारतीय संस्कृती बाजूला ठेवून भारतीय अकारण पाश्‍चिमात्य संस्कृतीचे आचरण करत आहेत. तुमचा उपक्रम चांगला असून सर्व शाळा-महाविद्यालये येथे विषय पोचवतो, असे आश्‍वासन शिक्षणाधिकारी आर्.डी. शिंदे यांनी दिले.

गुरुपौर्णिमा २०२० चा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पाहिल्यानंतर समाजातून मिळालेले अभिप्राय

गुरुपौर्णिमा २०२० चा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पाहिल्यानंतर जिज्ञासूंचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘जीवनाला नवी दिशा मिळाली, गुरुपूजनाचा आनंद घेता आला’ यांसारख्या प्रातिनिधिक स्वरूपाचे मनोगत अनेक जिज्ञासूंनी व्यक्त केले.

व्यक्ती, समाज आणि देश आदर्श कसा असावा, हे हिंदु धर्माने संपूर्ण जगाला दाखवून दिले ! – प्रमोद मुतालिक, अध्यक्ष, श्रीराम सेना

जगातील सर्वांनीच सुखी रहावे, असे हिंदु धर्म सांगतो, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले.

काश्मीरमध्ये पनून काश्मीरची स्थापना करायलाच हवी ! – राहुल कौल, अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर

चर्चा हिंदु राष्ट्राची ! काश्मिरी हिंदूंचे विस्थापन म्हणजे केवळ राजकीय षड्यंत्र नसून हिंदु धर्मावरील आघातच आहे. काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून द्यायचा असेल, तर आमचा वंशविच्छेद झाला आहे, हे प्रथम अधिकृतरित्या मान्य करावे लागेल !

देवतांचे विडंबन रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीने वर्ष २०२१ मधील जाहीर सभांचे रणशिंग फुंकले !

मथुरा येथे फलक प्रसिद्धीच्या माध्यमातून विहंगम प्रसार

आदर्श रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

अमरावती येथील सुश्री रामप्रियाजी यांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट

संत प.पू. सुधांशू महाराज यांच्या येथील शिष्या सुश्री रामप्रियाजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सनातन संस्थेच्या सौ. बेला चव्हाण आणि सौ. छाया टवलारे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.

फरिदाबाद येथे फलक प्रसिद्धीच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती अखंड कार्यरत आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येतात. या हिंदु राष्ट्र जागृती सभांचा मुख्य उद्देश ‘भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी सामान्य हिंदू, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांना संघटित करणे’, हा आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा आज झंझावात !

शनिवार, ६ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. वैयक्तिक संपर्क, सामाजिक प्रसारमाध्यमे, फलकप्रसिद्धी, तसेच वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांद्वारे लाखो जिज्ञासूंपर्यंत लोकांपर्यंत सभेचा विषय पोचवण्यात आला आहे.

परशुराम, अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज निर्माण करा ! – हर्षद खानविलकर

आता आपल्यालाच राष्ट्राभिमान जागवण्याची आवश्यकता आहे. २६ जानेवारीनिमित्त शौर्यजागृती करण्याची आवश्यकता आहे. शारीरिक, मानसिक यांसह आपल्याला बौद्धिक आणि आध्यात्मिक बळही वाढवायचे आहे.