महर्षींच्या आज्ञेने सनातनच्या गुरुपरंपरेचे पूजन करून भावपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात व्यक्त केली कृतज्ञता !

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य आध्यात्मिक संस्था यांच्या वतीने भारतात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा !
गुरु माता गुरु पिता ॥ गुरु अमुची कुलदेवता ॥१॥
घोर पडता संकटे ॥ गुरु रक्षी मागे पुढे ॥२॥
काया, वाचा आणि मन ॥ गुरु चरणी अर्पण ॥३॥
एका जनार्दनी शरण ॥ गुरु एक जनार्दन ॥४॥

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या वतीने विदेशात १२ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या (‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या) वतीने विदेशात १२ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध ठिकाणी आयोजित केलेल्या या गुरुपौर्णिमा महोत्सवात साधकांनी भावावस्था, तसेच चैतन्यदायी वातावरण अनुभवले.

जयपूर (राजस्थान) येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे मार्गदर्शन

येथे साजर्‍या करण्यात आलेल्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या दैवी प्रवासाच्या निमित्ताने येथे आलेल्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात गुरुपौर्णिमेला उपस्थित होत्या. या वेळी त्यांनी उपस्थित साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन केले.

नेहमी सत्कर्म करून सद्गुरूंची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करा !

साधकांनी कोणतेही कर्म करतांना फळाची अपेक्षा न ठेवणे योग्यच; कारण सत्कर्माची चांगली फळे आणि कुकर्माची वाईट फळे, हा सृष्टीचा नियमच आहे; म्हणून यात आपल्या अपेक्षांना काहीच स्थान नाही. असे असले, तरी नेहमी सत्कर्म करत रहावे, तसेच सद्गुरूंची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करावा.

‘ईश्‍वरी राज्या’च्या स्थापनेविषयी आश्‍वस्त करणारे एकमेवाद्वितीय द्रष्टे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘ईश्‍वरी राज्या’च्या स्थापनेसाठी आवश्यक संतांची १०० ही संख्या पूर्ण : सनातनच्या संतांच्या मांदियाळीत १०२ संत विराजमान

अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !

या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तन, मन आणि धन यांचा अधिकाधिक त्याग करून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सर्वांना लाभली आहे.

जाणूनी श्री गुरूंचे मनोगत…

गुरु-शिष्य परंपरा हे भारताचे वैशिष्ट्य आहे; किंबहुना तो भारताचा आत्मा आहे. या गुरु-शिष्य परंपरेने केवळ व्यक्तिगत आध्यात्मिक उन्नतीचा विचार न करता राष्ट्रोद्धाराचे कार्य केले.

संतांप्रती भाव असलेले आणि संतत्वाचे मोल खर्‍या अर्थाने जाणलेले परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरुदेवांसाठी साधकच सर्वस्व आहेत. ‘मला सर्व फुलांत ‘साधक फूल’ सर्वांत प्रिय आहे’, असे त्यांनी एकदा म्हटले होते. खरेच, ‘साधकांसाठी किती करू नी काय काय करू’, असे त्यांना वाटत असते.


Multi Language |Offline reading | PDF