मथुरा येथे फलक प्रसिद्धीच्या माध्यमातून विहंगम प्रसार

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन

श्रीकृष्णद्वाराच्या ठिकाणी लावलेला ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा निमंत्रणाचा फलक
श्रीकृष्णजन्मभूमी मंदिराचे अधिकारी श्री. राजीव श्रीवास्तव निमंत्रण स्वीकारतांना (डावीकडे)

मथुरा – आदर्श रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचा प्रसार अधिकाधिक लोकांपर्यंत व्हावा, यासाठी येथील भगवान श्रीकृष्ण मंदिराच्या गेट क्रमांक १ वर फलक प्रसिद्धी करण्यात आली. तसेच या मंदिराच्या गेट क्रमांक २ वर भित्तीपत्रक लावण्यात आले. या वेळी श्रीकृष्णजन्मभूमी मंदिराचे अधिशासी अधिकारी श्री. राजीव श्रीवास्तव यांना हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे निमंत्रण देण्यात आले. या सभेला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, सुदर्शन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक आणि अध्यक्ष श्री. सुरेश चव्हाणके संबोधित करणार आहेत.