सनातन संस्कृतीचे श्रेष्ठत्व आधुनिक विज्ञानाला मान्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
‘ज्योतिष शास्त्र नाही’, ‘आमच्याहून कितीतरी लांब असलेल्या ग्रहांचा मानवांवर परिणाम कसा होईल ?’, असा सनातन धर्माच्या विरोधकांकडून प्रचार केला जातो; परंतु आज आधुनिक विज्ञानही मान्य करते की, अमावास्या आणि पौर्णिमा यांचा मानवाच्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो.