गुरुपौर्णिमा २०२० चा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पाहिल्यानंतर समाजातून मिळालेले अभिप्राय

‘गुरु-शिष्य परंपरा’ हीच भारताची खरी ओळख; मात्र या वर्षी दळणवळण बंदीमुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना ५.७.२०२० या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे प्रत्यक्ष सोहळ्यांचे आयोजन करता आले नाही. असे जरी असले, तरी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्रचकती दाखवण्यात आली. या महोत्सवांना जिज्ञासूंचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘जीवनाला नवी दिशा मिळाली, गुरुपूजनाचा आनंद घेता आला’ यांसारख्या प्रातिनिधिक स्वरूपाचे मनोगत अनेक जिज्ञासूंनी व्यक्त केले. यातील काही निवडक अभिप्राय पुढे देत आहोत.   

(भाग १)

१. डॉ. राजन पोरे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाच्या ध्वनीचित्रचकतीतून ‘आध्यात्मिक उन्नतीसाठी साधनेचे महत्त्व आणि त्यासाठी स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन कशा प्रकारे करता येईल ?’, याविषयी साध्या-सोप्या भाषेत मार्गदर्शन मिळाले. ‘साधनेमध्ये येणार्‍या अडचणींवर मात कशी करता येईल ?’, याविषयी त्यांनी सुंदर प्रबोधन झाले. त्यामुळे मला अंतःप्रेरणा मिळाली. सनातन संस्थेच्या विविध उपक्रमांत सहभागी होऊन सेवा करण्यासाठी मी यापुढे सक्रीय राहीन.’

२. श्री. तुळशीराम भापकर

‘गुरुपौर्णिमेचा ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा सनातन संस्था आणि सर्व साधक यांनी अतिशय चांगल्या प्रकारे साजरा केला. तो पाहून मला पुष्कळ आनंद वाटला. त्या वेळी माझ्या मनामध्ये गुरूंविषयी उच्च कोटीचा भाव जागृत झाला आणि देवत्वाची अनुभूती आली. पुष्कळ प्रसन्न वाटले. आमच्या पूर्ण कुटुंबाने हा सोहळा पहिला आणि गुरुपौर्णिमेचा आनंद लुटला.’

३. श्री. पवार

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्रचकती पाहून बरे वाटले. ‘माणसाने वर्तमानकाळातच रहावे. अहंपणा नसावा’, असे त्यांचे सांगणे होते.

४. सौ. स्वाती फळेबाय, वाचक

‘पुष्कळ छान वाटले. ‘वर्तमानकाळाचा विचार करणे, घरालाच आश्रमासारखे पहाणे’, असे केल्यास बर्‍याच गोष्टी साध्य होतात. साधनेला महत्त्व देणे आवश्यक आहे’, ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनातील सूत्रे पुष्कळ आवडली.’

५. डॉ. अमृता जठार

‘मला पुष्कळ प्रसन्न वाटले. आतापर्यंत मी परात्पर गुरु डॉ. आठवलेजींचे केवळ छायाचित्र पाहिले होते; पण आज ‘ऑनलाईन चलत्चित्र (व्हिडिओ)’ पहायला मिळाले. पुष्कळ छान वाटले.’

६. श्री. श्रीकांत ठाकूर आणि सौ. शिल्पा ठाकूर (डोंबिवली)

‘गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेसंबंधी मार्गदर्शन पुष्कळच मोलाचे होते. त्यातून माझ्या बर्‍याच शंकांचे निरसन झाले. आम्ही पुष्कळ उशिरा सनातन संस्थेच्या संपर्कात आलो असलो, तरी आज आम्ही स्वतःला खरोखरच भाग्यवान समजतो की, येथून पुढे आमच्या जीवनाला एक आध्यात्मिक दिशा मिळत आहे.’

७. डॉ. सोनल भट (डोंबिवली)

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पहाण्याची आणि ऐकण्याची ‘ऑनलाईन चलत्चित्राद्वारे (व्हिडिओ)’ संधी मिळाली. त्यांच्या सहजसुंदर बोलण्यातून अनेक प्रश्‍नांची उत्तरे सहजच मिळून गेली.

८. सौ. गीतांजली धर्मराज शिंदे (डोंबिवली)

‘ऑनलाईन’ कार्यक्रमाद्वारे पवित्र मंत्रांच्या उच्चारणाने गुरुपूजनाचा सोहळा प्रत्यक्षात अनुभवण्याचे महाभाग्य माझ्या कुटुंबाला लाभले. आमची वास्तू पवित्र झाली. ‘कोरोना’च्या भयावह संकटकाळात ‘घराघरांत सद्गुरूंच्या छायाचित्राचे मंत्रघोषात पूजन पहायला मिळणे’, ही तर आनंदाची पर्वणीच होती. जगात शांतता आणि सहिष्णुता प्रस्थापित होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ओजस्वी वाणीतून मिळालेला ज्ञानोपदेश आपल्या सर्वांना भक्ती, प्रेम, राष्ट्रभक्ती, वात्सल्यभाव, मानवता अन् त्याग यांची शिकवण देतो. ‘नव्या पिढीवर सुसंस्कार करणे’, ही काळाची आवश्यकता आहे. सद्गुुरूंचे प्रवचन म्हणजे पूर्णत्वाचा आविष्कार ! सनातन संस्थेच्या या विश्‍वव्यापी महान कार्याला माझे विनम्र अभिवादन !’

९. श्रीमती सीमा शिलोत्री, वाचक (डोंबिवली)

‘आज पहाटे मला स्वप्नात सद्गुरूंचे दर्शन झाले. खरेच आपल्यावर सद्गुुरूंचा वरदहस्त आहे. आपण नामजप अधिक केला पाहिजे. सद्गुरूंना कोटी कोटी प्रणाम !’

१०. श्री. संदीप पांडे (डोंबिवली)

‘यंदाचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पुष्कळ छान वाटला. मनाला समाधान वाटले. कोरोनाच्या महामारीच्या संकटाची भीती न्यून झाली, तसेच ज्ञानात भरही पडली.’

११. श्रीमती विजया पाटील

‘पुष्कळच छान वाटले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन पुष्कळच भावले. ‘ते ऐकतच रहावे’, असे वाटत होते.’

१२. श्री. प्रशांत सरवटे (डोंबिवली)

‘कार्यक्रम छान होता. परात्पर गुरु डॉ. आठवले यांंचे ‘ऑनलाईन चलत्चित्राद्वारे (व्हिडिओ)दर्शन झाले. या दर्शनाने पावन झालो.’

१३. श्री. सुशीलकुमार राऊत (डोंबिवली)

‘गुरुपौर्णिमेचा सोहळा पाहून मला पुष्कळ धन्यता वाटली. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनामुळेच साधनेत वेगाने प्रगती करू शकतो’, हा विचार दृढ झाला. ‘या आपत्काळातही हा सोहळा पहाण्याचे भाग्य लाभले’, त्याविषयी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! या सोहळ्यानंतर घरातील वातावरणात असलेले जडत्व नाहीसे होऊन प्रसन्न आणि चैतन्यमय वातावरणाचा अनुभव आला. कृतज्ञता !’

१४. श्री. आशिष वैकुंठे (इंग्रजी वाचक)

‘कार्यक्रम चांगला आणि माहितीजन्य होता. कार्यक्रम पाहून आम्ही धार्मिक कृतीविषयी जागरूक झालो. आम्ही आपल्या अभियानाचे नक्कीच अनुसरण करू.’

१५. श्री. अजय भारंबे (कल्याण)

‘आज सकाळपासूनच परात्पर गुरुदेवांनी मला अनुभूती दिल्या. नामजप करतांना माझ्या मनातील विचार अत्यल्प होते. शरिरात सर्व चक्रांना कंपने जाणवत होती. ‘सहस्रारचक्रातून एक प्रकारची ऊर्जा सर्व शरिरात प्रवेश करत आहे’, असे वाटत होते. नामजप अखंड चालू होता. दैनिक ‘सनातन प्रभात’ने आवरण काढतांना दैनिकातील चैतन्य जाणवत होते आणि ‘स्वतःभोवतालचे आवरण न्यून होत आहे’, असे वाटले. परात्पर गुरु डॉ. आठवले ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया किती महत्त्वाची आहे !’, हे मलाच सांगत आहेत’, असे जाणवले. गुरुचरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली की, या काळातही परात्पर गुरुदेव आपल्याला दर्शन देऊन मार्गदर्शन करत आहेत.’

१६. डॉ. राजश्री घाडगे (कल्याण)

‘आज गुरुमाऊलींच्या मुखातून साधनेचे महत्त्व ऐकण्याचे भाग्य मला मिळाले. ‘अध्यात्म हे बुद्धीपलीकडील शास्त्र आहे आणि ते कृतीत उतरल्याविना अनुभूती येत नाहीत’, हे कळले. ‘परात्पर गुरु किती कळकळीने आपल्याला साधना करायला सांगत आहेत आणि या सर्व गोष्टी कृतीत आणण्यासाठी आपण किती आळस करतो’, अशी खंत वाटली. ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया प्रभावीपणे राबवली पाहिजे. नामजप भावपूर्ण केला पाहिजे’, असा निश्‍चय झाला. ‘आपल्यासह समाजालासुद्धा ही गोष्ट सांगणे आवश्यक आहे’, असे वाटले. गुरुचरणी कृतज्ञता !’

१७. सौ. अंजली ज. कुलकर्णी (कल्याण)

‘स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करायला पाहिजेत’, याची जाणीव झाली. स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न केले, तरच आपली साधना चांगली होऊन आपण या आपत्काळात तरून जाऊ. परात्पर गुरुदेवांना ‘ऑनलाईन चलत्चित्राद्वारे (व्हिडिओ) पाहिले. त्यांना पाहून मला आनंद झाला. रात्री झोपेत मला आनंद वाटत होता.’

१८. श्री. संजीव अर्डेकर (कल्याण)

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्रचकती पाहिली. त्यात त्यांनी मोक्षाचा, म्हणजे ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग स्पष्ट केला. तसेच परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्व प्रश्‍नांची उत्तरे सोप्या शब्दांत आणि सहजरित्या दिली. ‘जणूकाही ते माझ्यामसोर बसलेले असून प्रवचन करत आहेत’, असे मला वाटले. हा कार्यक्रम आम्हाला अध्यात्माच्या वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला.’

१९. सौ. सोनाली भारंबे (कल्याण)

‘स्वभावदोष-निर्मूलनाचे महत्त्व, कुठलेही काम सेवा म्हणून करणे महत्त्वाचे आहे, बुद्धी हा साधनेतील अडथळा आहे, अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे’, हे सर्व पक्के झाले. माझा भाव पुष्कळच जागृत झाला.’         (क्रमशः उद्याच्या दैनिकात)

लेखाचा भाग २ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/450372.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार समाजातील व्यक्तींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक