‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम
जत (जिल्हा सांगली), १० फेब्रुवारी (वार्ता.) – आपली महान भारतीय संस्कृती बाजूला ठेवून भारतीय अकारण पाश्चिमात्य संस्कृतीचे आचरण करत आहेत. तुमचा उपक्रम चांगला असून सर्व शाळा-महाविद्यालये येथे विषय पोचवतो, असे आश्वासन शिक्षणाधिकारी आर्.डी. शिंदे यांनी दिले. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ पूजनदिन’ म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ९ फेब्रुवारी या दिवशी शिक्षणाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी त्यांनी हे आश्वासन दिले. या वेळी सौ. नीला हत्ती, सौ. संगीता पट्टणशेट्टी, सौ. अंबिका माळी उपस्थित होत्या.
जत येथे तहसीलदार कार्यालयात उपतहसीलदार पी.एम्. गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले. ‘हा उपक्रम स्तुत्य असून ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवणे आवश्यक आहे’, असे मत त्यांनी व्यक्त केले. हे निवेदन जत येथील उपविभागीय कार्यालय येथेही देण्यात आले.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या
१.‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांचे प्रमाण पहाता शिक्षणाधिकार्यांनी प्राचार्यांची बैठक घेऊन महाविद्यालयांत ‘व्हॅलेंटाईन डे’चे तोटे सांगावेत आणि भारतीय संस्कृतीची माहिती देणार्या व्याख्यानांचे आयोजन करण्याविषयी निर्देश द्यावेत. या संदर्भातील लेखी निर्देश सर्व प्राचार्यांना देण्यात यावेत.
२. शालेय स्तरांवर असे दिवस साजरे होत नसले, तरी प्राथमिक-माध्यमिक वर्गातील विद्यार्थीच पुढे युवक बनून महाविद्यालयांत जात असल्याने असे दिवस साजरे न होण्यासाठी त्यांचेही प्रबोधन होणे आवश्यक आहे. तरी शाळांमधूनही ‘मातृ-पितृ पूजनदिन’ हा उपक्रम साजरा होण्यासाठी मुख्याध्यापकांनी पुढाकार घेण्यासाठी आग्रह धरावा.