व्यक्ती, समाज आणि देश आदर्श कसा असावा, हे हिंदु धर्माने संपूर्ण जगाला दाखवून दिले ! – प्रमोद मुतालिक, अध्यक्ष, श्रीराम सेना

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

मुंबई – गेल्या २५ वर्षांपासून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या दोन्ही संस्था हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समाजामध्ये जागृती करत आहेत. इतक्या प्रभावीपणे हिंदूंमध्ये करत असलेल्या जागृतीविषयी मी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे अभिनंदन करतो. हिंदु समाज हा सर्वश्रेष्ठ समाज आहे. जगात पुष्कळ ठिकाणी अध्यात्माचा प्रसार चालू आहे. व्यक्ती, समाज आणि देश आदर्श कसा असावा, हे हिंदु धर्माने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. जगातील सर्वांनीच सुखी रहावे, असे हिंदु धर्म सांगतो, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. ते ६ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते.

प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल वानखेडे यांनी केलेल्या शंखनादानंतर सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सनातन पुरोहित पाठशाळेचे पुरोहित श्री. श्रेयस पिसोळकर यांनी वेदमंत्रपठण केले. यानंतर श्री. रमेश शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला. या वेळी सनातन संस्थेच्या बालसाधकांची राष्ट्र आणि धर्मजागृती यांविषयीची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले.

श्री. प्रमोद मुतालिक

या वेळी श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले

१. मुसलमान आणि ख्रिस्ती म्हणतात, आमचाच पंथ सर्वश्रेष्ठ आहे; मात्र हिंदू ‘केवळ आमचा धर्म श्रेष्ठ’, असा कधीही आग्रह करत नाहीत. ‘ईश्‍वर एक आहे’, अशीच हिंदूंची शिकवण आहे. हिंदू कधीही अन्य धर्मियांना बळजोरीने स्वत:चा धर्म स्वीकारण्यास सांगत नाहीत. हा हिंदूंचा सर्वश्रेष्ठ गुण आहे. हिंदूंनी कधीही मशीद तोडून तेथे मंदिर बांधले नाही, ख्रिस्ती देशांवर हिंदूंनी कधीही आक्रमण केले नाही, हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे; मात्र भारताला शेकडो वर्षे पारतंत्र्यात रहावे लागले.

२. पुष्कळ मोठ्या संघर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. ते मिळत असतांना भारताच्याच भूमीतील एक भाग म्हणजे ‘पाकिस्तान’ म्हणून मुसलमानांना देण्यात आला, याचे मोठे दु:ख आहे. भारताचे तुकडे का करण्यात आले ? त्या वेळी देशासाठी बलीदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची आठवण का झाली नाही ? देशाची फाळणी का केली ? याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. त्या पाकिस्तानमुळे अद्यापही भारताला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असंघटित हिंदु समाजाला सनातन संस्थेसारख्या सहस्रो संघटनांनी जागृत केले. त्यांच्यात स्वाभिमान निर्माण केला आहे.

३. गेल्या ५०० वर्षांपासून लढा चालू असलेले भव्य दिव्य राममंदिर साकार होत आहे. हे केवळ चार भिंतींचे मंदिर नव्हे, तर शक्तीप्रदान करणारे आणि राष्ट्राभिमान जागृत करणारे मंदिर आहे. तन, मन आणि धन यांचा त्याग केल्यास हिंदु राष्ट्र स्थापन होण्यास वेळ लागणार नाही. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला पाठिंबा द्या. हिंदू संघटित झाल्यास हिंदु राष्ट्र स्थापन होण्यास वेळ लागणार नाही.

आपत्काळात मनोबल आणि आत्मबल टिकण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

सद्गुरु नंदकुमार जाधव

अनेक द्रष्टे संत आणि भविष्यवेत्ते यांनी आपत्काळाविषयी सूचित केले आहे. आज तिसर्‍या महायुद्धाची टांगती तलवार सर्वांच्या डोक्यावर आहे. या महायुद्धाची ठिणगी कधी कुठे पडेल, ते सांगता येणार नाही. याला सामोरे जाण्यासाठी व्यक्तीच्या शारीरिक सक्षमतेसमवेत मनोबल आणि आत्मबल उत्तम असणे आवश्यक आहे. हे मनोबल पैशांनी विकत घेता येऊ शकत नाही, तर त्यासाठी साधनाच करावी लागते. कलियुगात ‘नामस्मरण’ साधना असल्याने प्रतिदिन कुलदेवतेचा नामजप करावा.

हिंदु राष्ट्राचे लक्ष्य समोर ठेवून प्रयत्नरत रहायला हवे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

१. येणार्‍या काळात टिकण्यासाठी हिंदूंच्या संघटनाची आवश्यकता आहे. या दृष्टीने हिंदु राष्ट्राचे लक्ष्य समोर ठेवून प्रयत्नरत रहायला हवे.

छत्रपती शिवरायांनी जसे हिंदवी स्वराज्यासाठी सर्व मावळ्यांना एकत्र जोडले, तसे हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांना समवेत जोडून आवश्यकतेनुसार त्यांना साहाय्य करायला हवे. अन्यायाच्या विरोधात संघटितपणे उभे रहायला हवे.

२. आपल्या राज्यघटनेत सर्व नागरिकांसाठी समानतेचे तत्त्व आहे; मात्र घटनेच्या काही कलमांचा वापर करून ‘सेक्युलरवाद्यां’नी हिंदूंना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवले आहे. घटनेच्या ‘अनुच्छेद ३०’मध्ये अल्पसंख्यांक समाज त्यांच्या धर्माच्या शिक्षणसंस्थांची स्थापना करू शकतात. त्या संस्थांना शासकीय अनुदान देतांना कुठलाही भेदभाव केला जाणार नाही, असे म्हटले आहे. अल्पसंख्यांकांना ही विशेष सवलत का ? याचा अर्थ शासकीय अनुदानातून चालणार्‍या शिक्षणसंस्थांमधून केवळ हिंदु धर्म शिकवण्यास प्रतिबंध आहे. म्हणजे हिंदूंच्या हिंदुस्थानात शाळांमध्ये कुराण आणि बायबल शिकवले जाऊ शकते; पण ‘भगवद्गीता’ आणि हिंदु धर्मग्रंथ शिकवले जाऊ शकत नाहीत. हा भेदभाव दूर करण्यासाठी हिंदूंनी सरकारकडे मागणी करायला हवी.

३. भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे, तसेच त्यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी म्हटले की, या देशात मुसलमानांना असुरक्षित वाटत आहे. १० वर्षे उपराष्ट्रपती, संयुक्त राष्ट्रात भारताकडून प्रतिनिधित्व, अनेक देशांसाठी भारताचे राजदूत, अशा प्रकारे अनेक पदे उपभोगूनही त्यांना भारतात असुरक्षित वाटते ?

४. गुजरात दंगलीवर खोटे चित्रपट काढले जातात, पुस्तके लिहून प्रचार केला जातो. यातून हिंदू भ्रमित होऊन स्वतःला अपराधी मानू लागतो आणि हिंदुत्वापासून दूर जाऊन ‘सेक्युलर’ (निधर्मी) बनण्याचा प्रयत्न करतो. हेच विरोधकांना हवे आहे. हिंदु समाज धर्माची साथ सोडून तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी झाला की, त्यांच्या अत्याचारांवर पडदा टाकणे सोपे जाते. त्यामुळे या अपप्रचाराला भुलू नका.

५. हलाल अर्थव्यवस्थेच्या निधीतून आतंकवादी प्रकरणांत अटक केलेल्या मुसलमानांना न्यायिक साहाय्य केले जात आहे. त्यामुळे हिंदूंनी कोणतीही वस्तू विकत घेण्यापूर्वी त्यावर ‘हलाल सर्टिफिकेट’ नाही ना, हे अवश्य पहा. बहुसंख्य असलेल्या हिंदूंनी स्वतःचा पैसा व्यय करून ‘हलाल’ नावाच्या ‘फूड जिहाद’ला बळी पडू नये.

डॉ. विजय जंगम

‘आपण जन्माने आणि कर्माने हिंदु आहोत’, असे आपण ठणकावून सांगितले पाहिजे ! – डॉ. विजय जंगम, प्रवक्ते, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

गेल्या दोन-तीन दशकांपासून हिंदु धर्मावर आक्रमणे होत आहेत. धर्मांतर, लव्ह जिहाद यांसह अनेक माध्यमांद्वारे ही आक्रमणे होत आहेत. सध्या अनेक पंथ त्यांच्या पंथांसाठी स्वतंत्र धर्माची मागणी करत आहेत. हे हिंदु धर्माला तोडण्याचे षड्यंत्र आहे. अशा वेळी ‘आपण जन्माने, कर्माने हिंदु आहोत’, असे ठणकावून सांगितले पाहिजे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अनेक ठिकाणी सभा किंवा मेळावे होतात, ही समाधानाची गोष्ट आहे; मात्र सहस्रो वर्षांचा इतिहास असलेल्या आपल्याला हिंदु धर्माविषयी जागृती करावी लागते, हे दुर्दैवी आहे. बांगलादेश-पाकिस्तानात आज हिंदूंवर अत्याचार होत आहेत. आजपर्यंत नेहमी हिंदु धर्म ‘सॉफ्ट टार्गेट’ राहिलेला आहे. अशा वेळी आता आपल्याला शांत राहून चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची जी शपथ घेतली होती, त्यानुसारच आपल्याला मार्गक्रमण करावे लागेल.

विशेष

  • ही सभा ‘फेसबूक’ आणि ‘यू ट्यूब’ यांच्या माध्यमातून ७८ सहस्र ३२२ लोकांनी प्रत्यक्ष पाहिली.
  • या वेळी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात विविध ठरावांचे वाचन करून त्याला संमती देण्यात आली.