फरिदाबाद येथे फलक प्रसिद्धीच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार

फरिदाबाद (हरियाणा) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती अखंड कार्यरत आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येतात. या हिंदु राष्ट्र जागृती सभांचा मुख्य उद्देश ‘भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी सामान्य हिंदू, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांना संघटित करणे’, हा आहे. आतापर्यंत झालेल्या सभांमुळे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद्घोष देशव्यापी झाला आहे. हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ६ फेब्रुवारीला ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत फरिदाबाद येथील सनातन धर्म मंदिर, सेक्टर २९ आणि नोएडा येथील शिव मंदिर, सेक्टर २२ येथे फलक प्रसिद्धीच्या माध्यमातून सभेचा प्रसार करण्यात येत आहे. याला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.