हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन सोशल मीडिया प्रगत प्रशिक्षण शिबीर’ पार पडले 

जगभरामध्ये हिंदु धर्माची होत असलेली हानी थांबवण्यासाठी, तसेच धर्म, संस्कृती, हिंदु राष्ट्र यांच्या विचारांंच्या प्रसारासाठी सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ जानेवारी या दिवशी विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन सोशल मीडिया प्रगत प्रशिक्षण’ शिबिराचे आयोजन करण्यात आले.

इंदूर (तेलंगाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर श्री हनुमानाचे विडंबन थांबले  

येथे एस्.आर्.जे. नावाचे एक खासगी आस्थापन आहे. हे आस्थापन मीठाच्या पाकिटावर श्री हनुमानाचे चित्र छापत होते.

केंद्र सरकारच्या प्राधिकरणाने सरकारी नियमावलीतून ‘हलाल’ शब्द हटवला !

हिंदूंच्या विरोधाचा परिणाम ! केंद्र सरकारचे अभिनंदन ! आता सरकारने हिंदूंच्या विरोधाची वाट न पहाता हिंदुविरोधी नियम, कायदे हटवावेत, तसेच हिंदूंच्या देवता, धर्म, समाज यांच्या रक्षणासाठी कायदे करावेत, असेच हिंदूंना वाटते !

दत्तजयंतीनिमित्त ‘ऑनलाईन’ सत्संग आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन

सनातनच्या साधिका कु. पूनम चौधरी आणि सौ. राजरानी माहुर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कु. चौधरी यांनी श्री दत्त यांनी केलेल्या २४ गुण गुरूंविषयी माहिती दिली.

पाश्चात्त्य विकृतीच्या विरोधात लढणाऱ्यांचा देशाप्रतीचा त्याग आठवून भारतीय संस्कृती जोपासा ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘३१ डिसेंबर या पाश्चात्त्य विकृतीला भारतभूमीतून हद्दपार करणे’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींचे प्रबोधन

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना ‘सनातन पंचांग’ भेट

सनातन आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले असल्याची प्रतिक्रिया गृहराज्य मंत्री आमदार शंभूराज देसाई यांनी दिली.

ऐतिहासिक बाणगंगेच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन जलस्रोत बाधित करणार्‍या खोदकामाला स्थगिती

बाणगंगा हा आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे. ही संस्कृती टिकवली पाहिजे. बांधकाम व्यावसायिक येथे रात्रीचे काम करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई होईल. जोपर्यंत याविषयीचा अहवाल येत नाही, या कामाला स्थगिती देण्यात येईल – महापौर, मुंबई

गोमंतकीय हिंदूंवर इन्क्विझिशनद्वारे अनन्वित अत्याचार केल्याच्या प्रकरणी पोप यांनी भारतियांची माफी मागावी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘गोवा मुक्तीदिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गोवा इन्क्विझिशन’ – ख्रिस्त्यांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचा रंक्तरंजित इतिहास’ या विषयावर कार्यक्रम

‘धर्माचे पाळण । करणें पाषांड (पाखंड) खंडण ॥’, या व्रताचे स्वत: पालन करून इतर धर्मप्रेमींकडूनही ते करवून घेणारे ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते !

‘धर्माचे पाळण । करणें पाषांड (पाखंड) खंडण ॥’, म्हणजे ‘धर्मद्रोही विचारांचे खंडण हेसुद्धा धर्मरक्षणच !’, हे व्रत त्यांनी घेतले होते. त्यांनी आयुष्यभर त्याचे पालन केले आणि इतर धर्मप्रेमींकडूनही करवून घेतले.

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे गैरप्रकार रोखा ! 

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडहिंग्लज पोलीस ठाणे आणि  प्रांत कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.