अमरावती येथील सुश्री रामप्रियाजी यांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट

डावीकडून सौ. बेला चव्हाण या सुश्री रामप्रियाजीना ग्रंथ भेट देताना आणि सौ. छाया टवलारे

अमरावती, ६ फेब्रुवारी – संत प.पू. सुधांशू महाराज यांच्या येथील शिष्या सुश्री रामप्रियाजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सनातन संस्थेच्या सौ. बेला चव्हाण आणि सौ. छाया टवलारे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच त्यांना सनातननिर्मित ग्रंथ आणि पुष्पगुच्छ भेट देऊन ६ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या हिंदु जनजागृती समिती आयोजित ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे निमंत्रण दिले. या वेळी सुश्री रामप्रियाजी म्हणाल्या की, ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार करीन.

हिंदु जनजागृती समितीच्या आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यांनी त्यांच्या संपर्कातील युवतींना समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण वर्गात सहभागी करून घेऊन प्रशिक्षण घेण्यास उद्युक्त केले. समितीकडून घेण्यात आलेल्या प्रांतीय अधिवेशनातही त्या सहभागी झाल्या होत्या. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावर त्यांची श्रद्धा आहे. त्या मार्गदर्शनातून नेहमी राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी प्रबोधन करतात. त्यांनी वाढदिवसानिमित्त सामूहिक सुंदरकांड पाठाचे आयोजन केले होते.