केंद्र सरकारने पुढाकार घेऊन राष्ट्र-धर्मविरोधकांवर कठोर कारवाई करावी ! – पायल रोहतगी, अभिनेत्री

‘चर्चा हिंदु राष्ट्र्राची !’ या विशेष संवादांतर्गत ‘ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवाद

ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या धर्मप्रेमींना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ग्रंथ भेट !

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या धर्मप्रेमींची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. विजया वेसणेकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित ‘अलंकारशास्त्र’ आणि ‘गुरुकृपायोग’ हे ग्रंथ भेट दिले.

कृष्णापरी हा सखा माझा ।

‘श्री. निरंजन चोडणकर याचा हात धरून साधनेत पुढे जाण्याचा आनंद श्री गुरुकृपेने आम्हाला घ्यायला मिळतो. त्याची साधनेतील साथ गुरुचरणी समर्पित होण्यासाठी सार्थकी होत आहे. गुरुदेव आणि निरंजनदादा यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

दळणवळण बंदीच्या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने कह्यात घेतली ११७ एकर भूमी !

देवस्थानाला भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या भूमीविषयी असा गैरकारभार हे सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत. म्हणून मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था करत असलेल्या राष्ट्र-धर्म कार्यास साहाय्य करणे आमचे कर्तव्य ! – चारुदत्त जोशी, संपादक, ‘बी न्यूज’

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रतिदिन ऑनलाईन विशेष धर्मसत्संगांचे प्रक्षेपण करण्यात येते. हे सत्संग २० एप्रिलपासून कोल्हापूर येथील स्थानिक ‘बी’ न्यूजच्या ‘भक्ती’ वाहिनीवरील चॅनल क्रमांक ५३१ वर प्रतिदिन सायंकाळी ७ वाजता प्रक्षेपित करण्यात येत आहेत.

प्रजासत्ताकदिनी हिंदु प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करा ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘शौर्य जागरण शिबिरा’मध्ये ते बोलत होते. या व्याख्यानाला पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अकलूज, मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांतून पुष्कळ धर्मप्रेमी उपस्थित होते.

देहली येथे ‘लिटील चॅम्प स्कूल’ शाळेत विद्यार्थ्यांचे प्रबोधन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील ‘लिटील चॅम्प स्कूल’ या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ कार्यक्रम घेण्यात आला.

सनातन निर्मित सत्संगांच्या ‘लिंक’ समाजातील व्यक्तींना पाठवण्याची सेवा करतांना ‘देव भरभरून देत आहे’, याची प्रचीती घेणारे पंढरपूर येथील श्री. अप्पासाहेब सांगोलकर !

‘आपण केवळ झोळी पसरायला हवी. देव भरभरून देत आहे. हे केवळ भगवंतच घडवू शकतो’, याची देव पावलोपावली जाणीव करून देत असतो याची जाणीव होते.

राष्ट्ररक्षणाचे धडे देऊन राष्ट्रप्रेमी युवा पिढी सिद्ध केली पाहिजे ! – सुमित सागवेकर

इंग्रजांनी भारताचे ‘इंडिया’, असे नामकरण केले. आपल्याला ‘इंडिया’ या शब्दामुळे गुलामगिरीची जाणीव होते. आपली ही मानसिकता पालटण्यासाठी आपण ‘भारत’ किंवा ‘हिंदुस्थान’ असेच संबोधणे आवश्यक आहे.

यवतमाळ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त गोळा झालेले राष्ट्रध्वज शासनाला सुपुर्द !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ जानेवारी या दिवशी शहरातील विविध भागांमध्ये ‘राष्ट्रध्वज सन्मान पेटी’ फिरवण्यात आली. त्यात खराब झालेले, खाली पडलेले आणि नागरिकांनी दिलेले राष्ट्रध्वज गोळा करण्यात आले.