रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी हटवा ! – छत्रपती युवराज संभाजीराजे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असलेली वाघ्या श्वानाची (कुत्र्याची) समाधी ३१ मेपूर्वी काढून टाकावी, अशी मागणी छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.