‘हिंदु जनजागृती समिती ही नेहमीच हिंदु धर्माचे रक्षण, हिंदु धर्माचा प्रसार आणि राष्ट्ररक्षण यांसाठी कार्यरत आहे. हिंदु धर्मविरोधी आणि राष्ट्रविरोधी कृत्यांचा समितीने नेहमी वैध मार्गाने विरोध केला आहे. अनेक आंदोलने आणि मोहिमा यांच्या माध्यमातून समिती कार्य करत आहे. हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने त्यांना त्यामध्ये यशही लाभत आहे. मागील ८ मासांपासून हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवर विविध मार्गांनी होणार्या आघातांचे प्रमाण वाढत आहे; परंतु कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी असल्याने समाजात जाऊन या आघातांचा विरोध करणे शक्य होत नव्हते. अशा परिस्थितीत हिंदु जनजागृती समितीने ‘टि्वटर ट्रेंड’च्या माध्यमातून या सर्व गोष्टींना विरोध केला.
या ‘ट्रेंड्स’ना समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळाला. काही ‘ट्रेंड’ हे राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकावरही आले. हिंदु जनजागृती समितीकडून काही ठिकाणी ‘ऑनलाईन’ आंदोलनेही घेण्यात आली. गुरुदेवांच्या कृपेने या आंदोलनांनाही प्रतिसाद मिळाला, तर काही आंदोलनांना यशही मिळाले. हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून केलेल्या ‘ट्रेंड्स’ना संपूर्ण भारतभरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद या लेखातून जाणून घेऊया.
(भाग १)
१. नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या निमित्ताने केलेले ‘ट्रेंड्स’ !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केले जाणारे ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ ३०.७.२०२० ते २.८.२०२० आणि ६.८.२०२० ते ९.८.२०२० या कालावधीत ‘ऑनलाईन’ पद्धतीने झाले. या अधिवेशनाच्या कालावधीत हिंदुत्वनिष्ठांकडून अधिवेशनाविषयी ‘#Unite_For_Hindu_Rashtra, #BanConversion, #Surajya_Abhiyan, #9thHinduAdhiveshanConcludes’, हे ‘हॅशटॅग’ वापरून ‘ट्रेंड’ केले गेले. हिंदु राष्ट्र, हिंदूंचे वाढते धर्मांतरण, सामाजिक दुष्प्रवृत्ती आदी विषयांची चर्चा या ‘ट्रेंड्स’च्या माध्यमातून ‘टि्वटर’वर झाली. नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये झालेल्या विषयांच्या संदर्भात अनेकांनी स्वतःचे मतही व्यक्त केले.
२.‘हिंदूंनी राममंदिरावर संतुष्ट न रहाता ‘रामराज्य’ आणण्यासाठी प्रयत्न करावेत’, यासाठी ‘#राममंदिर_से_रामराज्य’, याद्वारे केलेली जागृती !
५.८.२०२० या दिवशी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिर बांधकामाच्या ठिकाणी भूमीपूजन झाले. अनेक दशकांच्या न्यायालयीन लढाईनंतर राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला. हिंदूंसाठी हा एक अत्युच्च आनंदाचा क्षण होता. यानिमित्त ५.८.२०२० या दिवशी धर्मप्रेमींकडून ‘#राममंदिर_से_रामराज्य’ हा ‘हॅशटॅग’ वापरून ‘ट्रेंड’ करण्यात आला. या ‘ट्रेंड’च्या माध्यमातून ‘केवळ राममंदिर निर्मितीवर संतुष्ट न रहाता आता हिंदूंनी रामराज्य (म्हणजे हिंदु राष्ट्र) स्थापनेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे’, याविषयी जागृती करण्याचा प्रयत्न केला.
३. मंदिर सरकारीकरणाने होणारी हानी लक्षात आणून देण्यासाठी केलेला ‘ट्रेंड’ ‘#FreeHinduTemples’ !
६.८.२०२० या दिवशी ‘#FreeHinduTemples’ हा ‘ट्रेंड’ करण्यात आला. या ‘ट्रेंड’च्या माध्यमातून हिंदु धर्माचा आधारस्तंभ असलेल्या मंदिरांवर होत असलेल्या आघातांविषयी जागृती करण्यात आली. ‘सरकारीकरण केलेल्या मंदिरांची स्थिती कशी भयावह आहे ? अनेक मंदिरांमधील सरकारी समित्यांमध्ये भ्रष्टाचार कसा चालू आहे ? मंदिरांच्या परंपरा, धार्मिक कृती आणि अन्य प्राचीन व्यवस्था इत्यादींमध्ये सरकारी हस्तक्षेप कसा होत आहे ?’ इत्यादींवर प्रकाश टाकण्यात आला. मंदिरांची ही दुःस्थिति सुधारण्यासाठी ‘मंदिरांना ‘निधर्मी’ सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करून ती भक्तांच्या हाती सोपवावीत’, अशी मागणीही ‘ट्रेंड’मध्ये करण्यात आली.
४. भारतीय वायूदलाची अपकीर्ती केल्याप्रकरणी ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ चित्रपटाशी संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी’, यासाठी केलेला ‘ट्रेंड’ राष्ट्रीय स्तरावर ४ थ्या स्थानावर येणे
१२.८.२०२० या दिवशी करण जोहरनिर्मित ‘गुंजन सक्सेना’ हा चित्रपट ‘ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झाला. ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ या चित्रपटाच्या काही भागातील (ट्रेलरमधील) काही दृश्ये आक्षेपार्ह असल्याचे समोर आले होते. या चित्रपटात ‘धर्मा प्रॉडक्शन’ने भ्रमित करणार्या आणि भारतीय वायूदलातील महिलांविरुद्ध नकारात्मक कार्य अन् संस्कृती चित्रित करणार्या काही घटना प्रस्तुत केल्या आहेत. भारतीय वायूसेनेद्वारे ‘प्रॉडक्शन हाऊस’ला ही दृश्ये हटवण्यास सांगितले होते; पण निर्मात्यांनी ती दृश्ये वगळली नाहीत. यावरून आपले भारतीय सैन्य आणि देश यांची अपकीर्ती करण्याचे हे षड्यंत्र असल्याचे कुणालाही वाटू शकते. यासाठी ‘१३.८.२०२० या दिवशी ‘संबंधित निर्माते, दिग्दर्शक, अभिनेता आदींवर भारतीय वायूदलाचा अवमान केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी आणि चित्रपटावर बंदी घालण्यात यावी’, अशी मागणी करणारा ‘टि्वटर ट्रेंड’ धर्मप्रेमींनी चालवला. या वेळी ‘#Karan_Johar_Insults_AirForce’, हे हॅशटॅग वापरून ‘टि्वट’ केले. हा ‘ट्रेंड’ राष्ट्रीय स्तरावर चौथ्या स्थानावर आला.
५. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी आणून त्याचा होणारा अवमान थांबवण्यासाठी केलेला ‘#RespectNationalFlag’ ‘ट्रेंड’ !
१५.८.२०२० या दिवशी संपूर्ण भारतात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या कालावधीत राष्ट्रध्वजाचा विविध प्रकारे वापर केला जातो. मा. मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या विक्रीवर बंदी घालूनही त्यांची विक्री केली जाते. राष्ट्रध्वजाचे छायाचित्र असलेले की-चेन, भ्रमणभाषची ‘कव्हर्स’, ‘टी-शर्ट्स’ इत्यादींची विक्री आणि खरेदी लोकांकडून केली जाते. याच समवेत राष्ट्रध्वजाचे छायाचित्र असलेले ‘फेस मास्क’ही ‘ई-कॉमर्स’वर विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. या सर्व माध्यमांतून आपल्या राष्ट्रध्वजाचा होत असलेला अनादर समोर आणण्यासाठी राष्ट्र आणि धर्म प्रेमींनी १४.८.२०२० या दिवशी ‘टि्वटर’वर ‘ट्रेंड’ चालवला. #RespectNationalFlag हे ‘हॅशटॅग’ वापरून ‘टि्वट’ करत ‘राष्ट्रध्वजाचा होणारा अनादर थांबवणे आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे’ हे आपले कर्तव्य आहे’, असा संदेश देण्यात आला.
६. ‘आश्रम’ या ‘वेब’ मालिकेतून साधूसंतांचा अवमान केल्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी ‘#BanAashramWebSeries’ केलेला ‘ट्रेंड’
प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ या नवीन वेब मालिकेमध्ये एका हिंदु साधूंना खलनायक दाखवून श्रद्धा आणि अपराध यांचा योगायोग दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. ही मालिका ‘एम्एक्स प्लेयर’वर २८.८.२०२० या दिवशी प्रदर्शित झाली. या मालिकेत एका संवादाच्या माध्यमातून ‘हिंदूंच्या साधू-संतांचे सगळे शिष्य किंवा अनुयायी हे मूर्ख असतात’, असे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ‘भक्ती आणि भ्रष्टाचार’ अशा ‘टॅगलाईन’ दाखवून मालिकेमधील साधूंना अधिकाधिक वाईट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावर निर्बंध लावून संबंधित निर्माते आणि दिग्दर्शक यांवर योग्य कारवाई करण्याची मागणी १९.८.२०२० या दिवशी ‘ट्रेंड’च्या माध्यमातून केली. या वेळी धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी ‘#BanAashramWebSeries’ हे ‘हॅशटॅग’ वापरले.
७. गणेशोत्सवाच्या वेळी आदर्श गणेशोत्सव साजरा होण्यासाठी ‘गणेशोत्सवाचे शास्त्र’ असा ट्रेंड करणे आणि तो राष्ट्रीय स्तरावर चौथ्या स्थानावर येणे
भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी या तिथीला, म्हणजेच २२.८.२०२० या दिवशी श्री गणेशचतुर्थी झाली. हा सण देश-विदेशात उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त धर्मप्रेमी हिंदूंनी २०.८.२०२० या दिवशी ‘टि्वटर’वर ‘#आदर्श_गणेशोत्सव’ हे ‘हॅशटॅग’ वापरून ‘ट्रेंड’ केले. यातून गणेशोत्सवाच्या वेळी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आणि ‘गणेशोत्सवाचे शास्त्र’ याविषयी जागृती करण्यात आली. हा ‘ट्रेंड’ राष्ट्रीय स्तरावर चौथ्या स्थानावर आला.
८. बेंगळुरू येथे झालेल्या दंगलीमागे ‘पी.एफ्.आय.’चे नाव पुढे येणे, ‘तिच्यावर बंदी घालण्यात यावी’, या मागणीसाठी ‘#BanPFI_StopRiots’ केलेला ‘ट्रेंड’
बेंगळुरू येथे झालेल्या दंगलीमागे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची (‘पी.एफ्.आय.’ची) राजकीय संघटना ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चे (‘एस्.डी.पी.आय.’चे) नाव समोर आले आहे. कर्नाटकचे मंत्री के.एस्. ईश्वरप्पा यांनी सांगितले, ‘‘एस्.डी.पी.आय. एक राष्ट्रविरोधी संघटना आहे. आम्ही तिच्यावर बंदी घालण्याचा विचार करत आहोत.’’ उत्तरप्रदेश पोलीस विभागाने ‘नागरिकत्व सुधारणा विधेयक’ विरोधात हिंसाचार पसरवण्याच्या प्रकरणांमध्ये जिहादी संघटना पी.एफ्.आय.च्या १०८ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये देहली येथील दंगलीमध्येही ‘पी.एफ्.आय.’चे नाव समोर आले होते. असे मानले जाते की, एप्रिल १९७७ मध्ये स्थापन झालेल्या ‘सिमी’वर जेव्हा बंदी घातली गेली, त्यानंतर लगेचच ‘पी.एफ्.आय.’ची निर्मिती केली गेली होती. ‘पी.एफ्.आय.’ या संघटनेची कार्यप्रणाली ‘सिमी’शी साम्य दर्शवते. या संघटनेवर झारखंड सरकारने या आधीच बंदी घातली आहे. बेंगळुरू आणि अन्य ठिकाणीही दंगली भडकवण्याचा आरोप ‘पी.एफ्.आय.’ संघटनेवर आहेत. ‘यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पहाता या संघटनेवर बंदी घातली गेली पाहिजे’, या मागणीसाठी सर्व राष्ट्रभक्तांनी ‘टि्वटर’वर २७.८.२०२० या दिवशी #BanPFI_StopRiots’, हे ‘हॅशटॅग’ वापरून ‘टि्वट’ केले. हा ‘ट्रेंड’ राष्ट्रीय स्तरावर चौथ्या स्थानावर आला.
९. ‘पुणे महानगरपालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी ‘फिरत्या विसर्जन हौदांसाठी कचरापेट्यांचा उपयोग करणे आणि मूर्तींच्या पुनर्विक्रीसाठी अनुमती देणे’, याद्वारे केलेल्या घोर अवमानाचा निषेध अन् ‘त्यांच्यावर कारवाई करावी’, यासाठी ‘ट्विट’ करणे
गणेशोत्सवाच्या काळात पुणे मनपाकडून ‘गणेशमूर्ती विसर्जन रथ’ या उपक्रमांतर्गत फिरत्या हौदांची सोय करण्यात आली होती. फिरत्या हौदांच्या निर्मितीसाठी पालिका प्रशासनाने चक्क कचरापेट्यांचा उपयोग केला होता, तसेच भाविकांकडून विसर्जनासाठी दान घेतलेल्या या गणेशमूर्ती विसर्जन न करता ‘स्वयंसेवी’ संस्थेला पुन्हा विक्री करण्याची अनुमती दिली’, असा आरोप पुणे मनपावर आहे. हा भ्रष्टाचार तर आहेच, तसेच गणेशभक्तांची घोर फसवणूकही आहे. पुणे मनपाच्या या धर्मविरोधी कृत्याचा निषेध करण्यासाठी आणि या भ्रष्टाचारामध्ये सामील झालेल्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ३१.८.२०२० या दिवशी ‘#पुणेमनपामूर्तीदान_घोटाळा’ आणि ‘#PMC_Ganeshmurti_Scam’ हे ‘हॅशटॅग’ वापरून ‘टि्वट’ केले.
१०. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर ‘ही हत्या हिंदुत्वनिष्ठांनीच केली आहे’, असे आरोप केले जाणे, त्यांचा खरा तोंडवळा समोर आणण्यासाठी ‘ऑनलाईन’ आंदोलन करून ट्विटरवर ‘ट्रेंड’ करणे
५.९.२०१७ या दिवशी गौरी लंकेशची हत्या झाली होती. त्यानंतर लगेचच साम्यवादी आणि ‘सोशल मिडिया’ यांच्याद्वारे ‘ही हत्या हिंदुत्वनिष्ठांनीच केली आहे’, अशा प्रकारचे आरोप केले गेले होते. गौरी लंकेश यांच्या भावाने ‘त्यांच्या हत्येच्या मागे नक्षलींचा हात असू शकतो’, असे सांगितले होते. ‘गौरी लंकेश यांचे नक्षलींशी संबंध होते’, असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. याविषयी ५.९.२०२० या दिवशी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून ‘ऑनलाईन’ आंदोलन करण्यात आले. या वेळी धर्मप्रेमींकडून ‘टि्वटर’वर ‘#TrueFaceOfGauriLankesh’ हे ‘हॅशटॅग’ वापरून ‘ट्रेंड’ करण्यात आला.’
(क्रमशः)
– श्री. प्रदीप वाडकर, सोशल मिडिया (२५.११.२०२०)
भाग २ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/459871.html