मुंबई – हिंदु धर्मावर होणार्या आघातांपैकी ‘मंदिर सरकारीकरण’ हा एक ज्वलंत आणि प्रमुख आघात आहे. याविषयी जागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ मार्च या दिवशी दुपारी ४.३० वाजता ‘मंदिर – संस्कृती रक्षा राष्ट्रीय अधिवेशन २०२१’ चे ‘ऑनलाईन’ आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या आरंभी अमरावती येथील शिवधारा आश्रमाचे पू. संतोषकुमार महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वेदमंत्रपठण आणि शंखनाद यांनी अधिवेशनाला प्रारंभ झाला.
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी अधिवेशनाचा उद्देश सांगितला. भारतभरातील विविध मान्यवरांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री. सुमित सागवेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला यू ट्यूब आणि फेसबूक यांच्या माध्यमातून विविध मंदिरांचे विश्वस्त, पुजारी अन् हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
(याविषयीचे सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)