#Exclusive : (म्हणे) ‘दिवाळीत फोडण्यात येणारे फटाके, ही पर्यावरणाची सर्वांत गंभीर समस्या !’ – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी ध्वनीप्रदूषण मोजणे आणि मशिदींवरून नियमित वाजणार्‍या भोंग्यांकडे दुर्लक्ष करणे, हा उघड पक्षपातीपणा आहे. सरकारने संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी !

न्यूयॉर्कमधील शाळांना मिळणार दिवाळीची सुट्टी !

न्यूयॉर्कचे महापौर एरिक अ‍ॅडम्स यांनी ही माहिती दिली. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर सर्व शाळांमध्ये याविषयीचा आदेश लागू होणार आहे.

फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये वाढ !

दिवाळीच्या कालावधीत फटाक्यांच्या धुरामुळे हवेचा दर्जा खालावला असून त्यामुळे अनेक श्वसनाच्या विकारांना निमंत्रण मिळाले आहे. जंतूंचा संसर्ग, खोकला, दमा आदी आजारांचे रुग्ण वाढल्याचे निरीक्षण तज्ञांनी नोंदवले आहे.

श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या वतीने वाडा येथील आदिवासी भागांत फराळ आणि फटाके यांचे वाटप

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेले श्रीमंतयोगी प्रतिष्ठान आज मोठ्या संख्येने युवकांना एकत्र करून सामजिक क्षेत्रात कार्य करत आहे. संघटना बरेच विषय हाताळून हिंदु धर्म कसा अबाधित राहील, या दृष्टीने प्रयत्न करत आहे.

प्रभु श्रीरामाच्या मार्गावरून चालल्यावरच द्वेष नष्ट होईल ! – न्यूयॉर्कचे महापौर

प्रभु श्रीरामाचे महत्त्व समजणारे पाश्‍चात्त्य अमेरिकेतील प्रतिष्ठित राजकारणी कुठे आणि भारतावर ६० वर्षांहून अधिक काळ राज्य करूनही ‘श्रीराम अस्तित्वातच नव्हता’, असे प्रतिज्ञापत्र सादर करणारी हिंदुद्वेष्टी काँग्रेस कुठे ?

हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा देणार्‍या पाकिस्तानी मुसलमान क्रिकेट खेळाडूला धर्मांधांचा विरोध !

अन्य धर्मियांचा सन्मान करणे, तसेच त्यांच्या सणांमध्ये त्यांना शुभेच्छा देणे, ही मानवता आहेत. तीही धर्मांध मुसलमानांकडे नाही. याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत !

कॅनडात दिवाळी उत्सवात खलिस्तान्यांचा गोंधळ : भारतीय समुदायाकडून चोख प्रत्युत्तर

ब्रॅम्पटन येथे २४ ऑक्टोबरला भारतीय समुदायातील लोक दिवाळी साजरी करत असतांना तेथे खलिस्तानवादी घुसले आणि त्यांनी हातात खलिस्तानी झेंडे घेऊन घोषणाबाजी चालू केली. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्याच वेळी  कॅनेडियन पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

फटाक्यांमुळे महाराष्ट्रात ३० हून अधिक आगीच्या घटना, अनेक जण घायाळ !

प्रदूषण, आर्थिक हानी आणि दुर्घटना यांना कारणीभूत ठरणारे फटाके टाळल्यास दिवाळी अधिक आनंदाची होईल !

व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी साजरी केली दिवाळी !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असणार्‍या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली.

सध्या दिवाळी साजरी करण्याचे पालटलेले स्वरूप, म्हणजे कष्ट करावे लागू नयेत, यासाठी काढलेली पळवाट !

सध्या दिवाळी साजरी करण्यासाठी कुटुंब कबिला (काही कुटुंबे) कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी (‘हिल स्टेशन’वर) मांसाहारादी चापायला निघून जातो. नातेवाईक घरी यायला नकोत आणि दिवाळीचा फराळ बनवायला नको, यांसाठी काढलेली ही युक्ती भलतीच लोकप्रिय झालेली आहे.