हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील ‘कुंभमेळा पेज’चे श्री १००८ महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी विश्‍वेश्‍वरानंद गिरी महाराज यांच्या हस्ते लोकार्पण !

कुंभमेळा पेज’चे लोकार्पण करताना श्री १००८ महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी विश्‍वेश्‍वरानंद गिरी महाराज आणि उजवीकडे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

हरिद्वार, १६ मार्च (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या हिंदी संकेतस्थळावरील ‘कुंभमेळा पेज’चे (कुंभमेळा पानाचे) लोकार्पण संन्यास आश्रम देवस्थानचे श्री १००८ महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी विश्‍वेश्‍वरानंद गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची वंदनीय उपस्थिती होती.

सनातन धर्माचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होईल ! – श्री १००८ महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी विश्‍वेश्‍वरानंद गिरी महाराज

श्री १००८ महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी विश्‍वेश्‍वरानंद गिरी महाराज म्हणाले, ‘‘कुंभमेळा ही आपली प्राचीन संस्कृती आहे. कुंभमेळ्याच्या माध्यमातून धर्मप्रचार केला जातो. भगवान शंकराचार्य यांनी धर्मरक्षणासाठी नागादल स्थापन केले, तर महामंडलेश्‍वर, आचार्य, शंकराचार्य यांच्या माध्यमातून शास्त्राद्वारे सनातन संस्कृतीचे रक्षण करण्याची परंपरा चालू केली. सध्या जे भाविक कुंभमेळ्याला येऊ शकत नाहीत, त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील कुंभमेळा पानाद्वारे माहिती मिळणार आहे. गंगानदीच्या सान्निध्यात या संकेतस्थळाच्या पानाचे लोकार्पण झाले असल्याने सनातन धर्माचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होईल. त्यामुळे तुम्हालाही धर्मप्रसाराचे फळ मिळेल, असा माझा आशीर्वाद आहे.’’

कुंभमेळा पानावर काय पहाल आणि वाचाल ?

कुंभमेळ्यामधील विविध वृत्तकुंभमेळ्याचा महिमाकुंभपर्वाची विविध स्थळे आणि त्याचे महत्त्व

हरिद्वारचे महत्त्वकुंभमेळ्याचे पावित्र्य कसे राखावे ?हरिद्वार कुंभमेळ्यातील काही मार्गदर्शक व्हिडिओ

कुंभमेळा पेजची लिंक : https://www.hindujagruti.org/hindi/hinduism/kumbh-mela