‘हिंदु जनजागृती समिती ही नेहमीच हिंदु धर्माचे रक्षण, हिंदु धर्माचा प्रसार आणि राष्ट्ररक्षण यांसाठी कार्यरत आहे. हिंदु धर्मविरोधी आणि राष्ट्रविरोधी कृत्यांचा समितीने नेहमी वैध मार्गाने विरोध केला आहे. अनेक आंदोलने आणि मोहिमा यांच्या माध्यमातून समिती कार्य करत आहे. मागील ८ मासांपासून हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवर विविध मार्गांनी होणार्या आघातांचे प्रमाण वाढत आहे; परंतु कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी असल्याने समाजात जाऊन या आघातांचा विरोध करणे शक्य होत नव्हते. अशा परिस्थितीत हिंदु जनजागृती समितीने ‘टि्वटर ट्रेंड’च्या माध्यमातून या सर्व गोष्टींना विरोध केला.
या ‘ट्रेंड्स’ना समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळाला. काही ‘ट्रेंड’ हे राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकावरही आले. समितीकडून काही ठिकाणी ‘ऑनलाईन’ आंदोलनेही घेण्यात आली. गुरुदेवांच्या कृपेने या आंदोलानांनाही समाजातून उत्तम प्रतिसाद मिळाला. काही आंदोलनांना यशही मिळाले. कालच्या लेखात आपण रामराज्य आणण्यासाठी केलेला ट्रेंड, मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात केलेला ट्रेंड, हिंदु धर्म आणि साधूसंत यांचा वेब सिरीजमधून होणारा अवमान रोखण्यासाठी केलेले ट्रेंड यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग देत आहोत.
भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/459483.html
(भाग २)
११. ‘हिंदुत्वनिष्ठांचे ‘फेसबूक पेज’ बंद, तर अन्य पंथीय त्यांच्या ‘फेसबूक’वरून विखारी प्रचार करत असतांना ते चालू ठेवणे’, या हिंदूविरोधी कृत्याला विरोध करण्यासाठी ‘हॅशटॅग’ वापरून ‘ट्विट’ करणे
‘भारतामध्ये अभिव्यक्तीस्वातंत्र्य असूनही ‘फेसबूक’ने हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह आणि सनातन संस्था यांसारख्या हिंदु नेता, कार्यकर्ता अन् हिंदु संघटना यांचे ‘फेसबूक पेज’ बंद केले. दुसर्या बाजूला हिंसक कार्य करणारे झाकीर नाईक आणि जमात उल दावा यांसारखे जिहादी आतंकवादी अन् आतंकी संघटना यांचे ‘फेसबूक पेजे’स विषारी प्रचार करत आहेत. हिंदू बहुसंख्यांक असलेल्या या देशात हिंदु समाजाचे आवाज दाबण्याचे संतापजनक कृत्य ‘फेसबूक’ने चालू केले. हिंदूविरोधी ‘फेसबूक’च्या या दमन नीतीला धर्माभिमानी हिंदूंनी ‘टि्वटर’च्या माध्यमातून विरोध केला. ६.९.२०२० या दिवशी ‘#Facebook_Targetting_Hindus’ हा ‘हॅशटॅग’ वापरून ‘टि्वटर’वर ‘ट्विट’ केले गेले.
१२. ‘आंध्रप्रदेशात मंदिरांवर होणार्या आघातांसाठी उत्तरदायी असलेल्यांवर कडक कारवाई करावी आणि सरकारने मंदिर संरक्षणासाठी ठोस पावले उचलावीत’, या मागणीसाठी ‘हॅशटॅग’ वापरून ‘ट्विट’ करणे
गेल्या काही दिवसांत आंध्रप्रदेशातील मंदिरांवर आक्रमण होण्याच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विजयवाडा येथील श्री कनकदुर्गा मंदिरातील ३ सिंहांच्या चांदीच्या मूर्ती चोरीला गेल्या. गोदावरी जिल्ह्यातील अंतर्वेदी येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मीनरसिंह स्वामी मंदिरातील प्राचीन रथ जाळण्यात आला. कृष्णा जिल्ह्यातील १२ व्या शतकातील प्राचीन शिव मंदिरातील नंदीची मूर्ती तोडण्यात आली. आंध्रप्रदेशात प्रतिदिन अशा प्रकारच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडत आहेत. या आघातांमुळे सर्व हिंदुप्रेमींच्या मनात तीव्र संताप आहे. ‘जगनमोहन रेड्डी यांचे सरकार आल्यापासून मंदिरांवरील आघातांमध्ये वाढ झाली आणि ते थांबवण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे’, असा काही हिंदुत्वनिष्ठांचा आरोप आहे. ‘आंध्रप्रदेशात मंदिरांवर होणार्या आघातांसाठी उत्तरदायी असलेल्या दोषींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी आणि जगनमोहन सरकारने मंदिरांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलावीत’, या मागणीसाठी २३.९.२०२० या दिवशी ‘#AndhraTemplesInDanger’ हे ‘हॅशटॅग’ वापरून ‘ट्विट’ केले गेले. हा ‘ट्रेंड’ राष्ट्रीय स्तरावर चौथ्या स्थानावर आला.
१३. फारूख अब्दुल्ला यांच्या भारतविरोधी विधानांचा निषेध करण्यासाठी ‘ट्रेंड’ केला जाणे आणि हा ‘ट्रेंड’ राष्ट्रीय स्तरावर प्रथम स्थानी येणे
‘काश्मिरी नागरिक स्वतःला भारतीय समजत नाहीत आणि ते भारतीय बनूही इच्छित नाहीत. चीनने त्यांच्यावर शासन करावे’, असे त्यांना वाटते’, असा दावा ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे नेते अन् राज्याचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केला होता. याच समवेत त्यांच्यावर भारतीय लष्कर आणि भारत यांचा अपमान करणारी अनेक विधाने केल्याचा आरोप आहे. याविषयी हिंदुत्वनिष्ठांनी ‘#Abdullah_ChineseAgent’ आणि ‘#Kashmir_With_India’, हे ‘हॅशटॅग’ वापरून ‘ट्रेंड’ केले. याद्वारे फारूख अब्दुल्ला यांच्या भारतविरोधी वक्तव्याचा निषेध केला आणि ‘त्यांच्यावर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी या ‘ट्रेंड’च्या माध्यमातून केली. हा ‘ट्रेंड’ राष्ट्रीय स्तरावर प्रथम स्थानावर आला.
१४. ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट’ हा विधीनियम रहित व्हावा’, या मागणीसाठी केलेला ‘ट्रेंड’
श्रीराम मंदिराविषयीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाला एक वर्ष झाले आहे. उत्तरप्रदेशातील मथुरेच्या न्यायालयात १३.३७ एकरवरील श्रीकृष्ण जन्मभूमीविषयी याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या याचिकेत शाही ईदगाह मशीद हटवण्याची आणि संपूर्ण भूमी रिकामी करण्याची मागणी केली आहे. अयोध्येत राममंदिराचे बांधकाम चालू झाल्यानंतर इस्लामी आणि ख्रिस्ती आक्रमणकर्त्यांनी उद्ध्वस्त केलेल्या काशी, मथुरा यांसह सर्व मंदिरे नव्याने बांधण्याची हिंदु समाजाची इच्छा आहे. ‘हिंदूंची मंदिरांविषयीची ही अपेक्षा पूर्ण करावी आणि ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट’ (Places of Worship Act) हा विधीनियम (कायदा) रहित करावा’, या मागणीसाठी धर्मप्रेमी हिंदूंनी १.१०.२०२० या दिवशी ‘#अब_काशी_मथुरा’ हा ‘हॅशटॅग’ वापरून ‘ट्रेंड’ केला.
१५. ‘संपूर्ण भारतभरात गोहत्येवर बंदी घालण्यात यावी’, या मागणीसाठी ‘ट्रेंड’ केला जाणे आणि तो राष्ट्रीय स्तरावर चौथ्या स्थानी येणे
‘भारतात गोहत्येवर बंदी आणावी आणि गोमातेच्या मारेकर्यांवर कठोर कारवाई व्हावी’, यासाठी ८.१०.२०२० या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटना अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ आंदोलन करण्यात आले. गोमाता संपूर्ण हिंदु समाजासाठी आदरणीय आणि पूजनीय आहे; परंतु आज अनिर्बंध चालू असलेल्या गोहत्येमुळे भारतीय गोवंशाच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत अन् काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भारतात अनेक ठिकाणी नियमबाह्य कत्तलखाने चालवले जातात. गायींची तस्करीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गोहत्या बंद करण्याच्या प्रयत्नात असलेले गोरक्षक आणि पोलीस यांच्यावरील आक्रमणेही वाढत आहेत. गोहत्या थांबवण्यासाठी विधीनियमांत (कायद्यात) तरतूदी आहेत; पण बहुतांश ठिकाणी पोलीस आणि प्रशासन त्यांचा प्रभावीपणे वापर करत नाही. गोमातेवरील हे संकट थांबवून ‘संपूर्ण भारतभरात गोहत्येवर बंदी घालण्यात यावी’, अशी मागणी या आंदोलनातून धर्मप्रेमींनी केली. यासाठी ‘टि्वटर’वर ‘#गोहत्या_रोको_धर्म_बचाओ’ हा ‘हॅशटॅग’ वापरून ‘ट्विट’ केले. हा ‘ट्रेंड’ राष्ट्रीय स्तरावर चौथ्या स्थानावर आला.
१६. ‘परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेली मथुरेसह सर्वच मंदिरे पुन्हा बांधली जावीत आणि ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट’ हा रहित करावा’, या मागणीसाठी केलेला ‘ट्रेंड’ राष्ट्रीय स्तरावर पहिल्या स्थानावर येणे
काही दिवसांपूर्वी मथुरेच्या नागरी (सिव्हिल) न्यायालयानेे श्रीकृष्ण जन्मभूमीविषयी नागरी खटल्याची (सिव्हिल सूट) याचिका फेटाळून लावली होती. यानंतर आता मथुरेच्या जिल्हा न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेली मथुरेसारखी सर्वच मंदिरे पुन्हा बांधली जावीत आणि ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट’ (Places of Worship Act) हा विधीनियम (कायदा) रहित करावा’, या मागणीसाठी धर्माभिमान्यांनी १५.१०.२०२० या दिवशी ‘#Reclaim_KrishnJanmabhoomi’ हा ‘हॅशटॅग’ वापरून ‘ट्रेंड’ केला. हा ‘ट्रेंड’ राष्ट्रीय स्तरावर पहिल्या स्थानावर आला.
१७. ‘हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला १८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने समितीकडून राबवण्यात येणार्या मोहिमा आणि त्यांना मिळत असलेले यश’ याविषयी ‘टि्वटर’वर ‘ट्रेंड’ करणे
राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी कार्यरत हिंदु जनजागृती समितीला घटस्थापनेच्या शुभदिनी १८ वर्षे पूर्ण झाली. या १८ वर्षांत समितीने धर्मशिक्षण, धर्मजागृती, राष्ट्ररक्षण, धर्मरक्षण आणि हिंदूसंघटन या पंचसूत्री उपक्रमाची यशस्वीरित्या कार्यवाही केली. देशभरातील बहुतेक राज्यांत आज समितीचे राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य चालू झाले आहे. प्रसार आणि ‘सोशल मिडिया’ यांद्वारे हिंदु राष्ट्र-स्थापनेचे हे कार्य अतिशय गतीने चालू आहे. या निमित्ताने समितीकडून राबवण्यात येणार्या विविध मोहिमा, त्यात समितीला मिळत असलेलेे यश, समितीने आयोजित केलेले विविध कार्यक्रम आदी विषयांना घेऊन धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांनी २२.१०.२०२० या दिवशी ‘#18YrsOfHJS_Hindu_Rashtra’ हा ‘हॅशटॅग’ आणि ‘हिन्दू जनजागृती समिती’ हा ‘की वर्ड’ वापरून ‘टि्वटर’वर ‘ट्रेंड’ केला.
१८. ‘आश्रम’ या ‘वेब’ मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर कारवाई करण्यासाठी केलेला ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर तिसर्या स्थानावर येणे
प्रकाश झानिर्मित ‘आश्रम’ ही मालिका ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वर दाखवण्यास आरंभ झाला आहे. २४.८.२०२० या दिवशी ‘आश्रम’च्या ‘वेब’ मालिकेचे ४ भाग ‘एम्एक्स प्लेअर अॅप’ आणि ‘वेबसाइट’ यांवर विनामूल्य दर्शवले गेले. यामध्ये अभिनेता बॉबी देओल हे बाबा निराला काशीपूरवाला यांची भूमिका साकारत आहेत. तो बाबा सहस्रो भक्त, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये असलेल्या आश्रमांचे विशाल साम्राज्य चालवतो. यासह त्याच्याकडे एक काळा पैलू आहे, ज्यात त्याच्या आश्रमात बलात्कार, खून, खंडणी, अमली पदार्थांचा व्यवसाय इत्यादींचा समावेश आहे. बाबा निराला यांचे पात्र बनवतांना ‘आश्रम’च्या निर्मात्यांनी त्यांना अत्यंत खालच्या पातळीवर दर्शवण्यात कुठलीही कसर सोडली नाही. यावरून स्पष्ट होते, ‘ही मालिका केवळ हिंदू आणि हिंदु साधूंची अपकीर्ती करण्यासाठीच बनवली गेली आहे. ‘हिंदु धर्माचा असा अपमान करणार्या ‘वेब सिरीज’ बनवणारे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर योग्य कारवाई केली जावी’, यासाठी हिंदुत्वनिष्ठांंकडून २४.१०.२०२० या दिवशी #Arrest_Prakash_Jha हा ‘हॅशटॅग’ आणि ‘आश्रम वेब सिरीज’ हा ‘की वर्ड’ वापरून टि्वटरवर ट्रेंड करण्यात आला. हा ‘ट्रेंड’ राष्ट्रीय स्तरावर तिसर्या स्थानावर आला.
१९. दिवाळीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सनातनच्या ग्रंथांच्या सवलतीच्या दरातील विक्रीसाठी ‘#Sanatan_Shop_Diwali_Sale’ या नावाने केलेले ‘ट्रेंड’ राष्ट्रीय स्तरावर चौथ्या स्थानावर येणे
दिवाळीच्या निमित्ताने ‘सनातन शॉप’चे ‘अँड्रॉईड अॅप’ आणि संकेतस्थळावरील सनातनच्या सात्त्विक ग्रंथांची विक्री यांवर २५.१०.२०२० ते २.११.२०२० या कालावधीसाठी सवलतीत विक्री करण्याचे आयोजन करण्यात आले होते. याचा प्रसार करण्यासाठी धर्मप्रेमींनी २८.१०.२०२० या दिवशी ‘#Sanatan_Shop_Diwali_Sale’ हा ‘हॅशटॅग’ वापरून ‘ट्रेंड’ केला. हा ‘ट्रेंड’ राष्ट्रीय स्तरावर चौथ्या स्थानावर आला.
२०. तमिळनाडूत अनेक दशकांपासून सरकार आणि प्रशासन यांच्याकडून हिंदु मंदिरांच्या मालमत्तेच्या केल्या जाणार्या गैरवापराच्या कृतीच्या निषेधासाठी केलेला ‘ट्रेंड’ राष्ट्रीय स्तरावर ४ थ्या स्थानावर येणे
हिंदु मुन्नानी यांनी म्हटले आहे, ‘कल्लाकुरीची जिल्ह्यातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय बांधण्यासाठी अधिकार्यांनी देवस्थानची ३५ एकर भूमी कह्यात घेतली आहे.’ हिंदु मुन्नानी यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. ते म्हणाले, ‘‘कल्लाकुरीची जिल्ह्यातील वीर चोलपूरम् श्री अर्धनारीश्वर मंदिराच्या जीर्ण अवस्थेविषयी चिंता व्यक्त करण्याऐवजी हिंदु धार्मिक आणि धर्मार्थ बंदोबस्ती विभागाने मंदिराच्या प्रस्तावित भूमी विक्रीविषयीचे विज्ञापन वृत्तपत्रांत दिले आहे. तमिळनाडूमध्ये गेल्या अनेक दशकांपासून सरकार आणि प्रशासन यांच्याकडून हिंदु मंदिरांच्या मालमत्तेचा गैरवापर करण्याच्या घटना घडत आहेत. या हिंदूविरोधी मानसिकतेचा आणि तमिळनाडू सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी २९.१०.२०२० या दिवशी ‘#Tn_Govt_Looting_Temples’ हा ‘हॅशटॅग’ वापरून ‘ट्रेंड’ केला. हा ‘ट्रेंड’ राष्ट्रीय स्तरावर चौथ्या स्थानावर आला.’
(समाप्त)
– श्री. प्रदीप वाडकर, सोशल मिडिया (२५.११.२०२०)