हिंदु जनजागृती समितीचा सामाजिक उपक्रम !
१४ मार्च धूलिवंदन आणि १९ मार्च रंगपंचमी या दिवशी सकाळी ९ पासून सायंकाळी ७ पर्यंत खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून जलाशयाचे प्रदूषण रोखण्यात येणार आहे. जलसंवर्धन आणि संस्कृतीरक्षण, या उद्देशाने हे अभियान असून यंदाचे हे २३ वे वर्ष आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी ८९८३३३५५१७ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
वार : शुक्रवार, दिनांक १४ मार्च, वेळ : सकाळी ९ ते सायं. ७
वार : बुधवार, दिनांक १९ मार्च, वेळ : सकाळी ९ ते सायं. ७