
सातारा, ८ मार्च (वार्ता.) – कोल्हापूर येथील ‘शिवाजी’ विद्यापिठाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार होण्यासाठी मी वर्ष २०१० मध्ये विद्यापिठात प्रस्ताव दिला होता. काही कारणांमुळे मला तो प्रस्ताव तेव्हा मागे घ्यावा लागला होता. त्यामुळे या मागणीसाठी माझा पूर्ण पाठिंबा असून हा विषय सातारा येथील छत्रपती घराण्यापर्यंत मी पोचवेन, तसेच या संदर्भात जे जे करणे शक्य आहे ते सर्व मी करेन, असे मत शिवाजी विद्यापिठाच्या सिनेटचे सदस्य आणि ‘डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी’च्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. अमित कुलकर्णी यांनी व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांनी त्यांची नामविस्ताराविषयी भेट घेऊन त्यांची भूमिका जाणून घेतली, तेव्हा त्यांनी हे मत व्यक्त केले.