कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करा ! – हिंदु जनजागृती समिती

सांगली, ११ मार्च (वार्ता.) – कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठाचे नामविस्तार करून ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असे नाव व्हावे आणि छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी ११ मार्च या दिवशी येथील जिल्हाधिकारी श्री. अशोक काकडे यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सांगली जिल्हा समन्वयक श्री. संतोष देसाई, धर्मप्रेमी सर्वश्री शुभम होसमठ, मंगेश चव्हाण, गणेश सगरे, अमित कवठेकर, अभिजित कोडग, अधिवक्ता वडार, समर्पित ढगे, हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे, श्री. अरुण वाघमोडे आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई केव्हा करणार ?