विद्युत् उपकरणांच्या थंडाव्यासाठी पंखा-कूलर यांचा वापर !
नंदुरबार – येथील वीज वितरण आस्थापनाच्या कार्यालयातील विद्युत उपकरणे कार्यान्वित ठेवण्यासाठी पंखा आणि जलशीतकरण यंत्र (कूलर) लावून त्यांना थंड करण्यात येत आहे. विद्युत् उपकरणे गरम होऊन विद्युत् पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी अशी उपाययोजना काढण्यात येत आहे.
इयत्ता दहावी-बारावीचा निकाल मे महिन्यात !
मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल मे महिन्यात घोषित होणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता बारावीचा, तर दुसर्या आठवड्यात दहावीचा निकाल घोषित होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.
बिबट्याच्या आक्रमणात तरुणी ठार !
नाशिक – येथे शेतात गवत कापणार्या पायल चव्हाण (वय २१ वर्षे) या तरुणीवर बिबट्याने आक्रमण केले. तिला ६-७ फूट फरफटत नेले. तिचे वडील आणि शेतकरी धावत गेल्याने बिबट्या तिला तेथे सोडून पसार झाला. तिला घायाळ अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले; पण आधुनिक वैद्यांनी तिला मृत घोषित केले.