VHP On Government Control On Mosque And Church : मंदिरांप्रमाणे चर्च आणि मशिदीही सरकारच्या नियंत्रणाखाली आणाव्यात !

विश्व हिंदु परिषदेची बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

विहिंपचे केंद्रीय संघटनेचे सरचिटणीस मिलिंद परांडे

पाटलीपुत्र (बिहार) – सरकारने केवळ हिंदूंच्या मंदिरांवर नियंत्रण ठेवू नये, तर चर्च आणि मशीद यांवरही नियंत्रण ठेवावे. त्यासाठी कायदा करावा, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेने केली आहे. विहिंपचे केंद्रीय संघटनेचे सरचिटणीस मिलिंद परांडे आणि अन्य पदाधिकारी यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांची भेट घेऊन त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली.

मिलिंद परांडे पुढे म्हणाले की,

१. राज्यघटना सर्व धर्मांना समान मानते. जर मशिदी आणि चर्च सरकारी नियंत्रणाबाहेर राहू शकतात, तर मंदिरांच्या संदर्भात भेदभाव का केला जातो ? हे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात असून समानतेच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. ही एक असमान आणि अन्याय्य व्यवस्था आहे, जी लवकरात लवकर काढून टाकली पाहिजे. सरकारने ही व्यवस्था लवकरात लवकर पालटावी, अशी आमची इच्छा आहे.

२. सर्व धर्मांना समान अधिकार मिळाले पाहिजेत. या प्रकरणी सरकारने कायदा करावा, अशी विहिंपची इच्छा आहे.

संपादकीय भूमिका

जर सरकारला मशिदी आणि चर्च सरकारच्या नियंत्रणात आणता येत नसतील, तर त्यांनी मंदिरेही सरकारीकरणातून मुक्त केली पाहिजेत !