आपली भारतीय संस्कृती कितीतरी प्राचीन आहे, असे आपण ऐकले आहे. रामायणाला अनुमाने ९ लाख वर्षे होऊन गेली आहेत. भगवद्गीतेला ५ सहस्र ५५५ वर्षे झाली आहेत आणि वेद अनादि काळापासून आहेत. वेदांना तर अपौरुषेय (वेद हे कुणा पुरुषाने लिहिलेले नाहीत) म्हटले आहे; कारण ते साक्षात् भगवंताची देण आहे. वेद आणि भारतीय संस्कृती आपल्याकडे एक ‘दैवी वारसा’ म्हणून आले आहेत. वाल्मीकि रामायणाच्या मूळ रूपामध्ये एका शब्दाचाही पालट झालेला नाही. गीतेतही एक शब्द पालटला गेला नाही. ही अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे.
एवढ्या प्राचीन गोष्टी आपल्याला मिळण्यामागे आपली ‘गुरु-शिष्य परंपरा’ आहे. आपण या परंपरेचा आदर केला पाहिजे आणि ही परंपरा आपल्यापर्यंत सुरक्षितपणे पोचली, त्यासाठी आपण आपल्या पूर्वजांप्रती अत्यंत कृतज्ञ राहिले पाहिजे. आपला सनातन धर्म कुणा एखाद्या व्यक्तीने स्थापन केलेला नाही, तर तो साक्षात् ईश्वरापासून आला आहे. आपल्या धर्मात केवळ एकच ग्रंथ नाही, तर अनेक ग्रंथ, वेद आणि उपनिषदे आहेत. एकच ग्रंथ असता, तर आपला सनातन धर्म मधल्या कालावधीत केव्हा तरी नष्ट झाला असता. सनातन धर्मामध्ये अनेक श्रेष्ठ पुरुष होऊन गेले. अनेकांनी सुंदर ग्रंथनिर्मिती केली आहे. हे खरे असले, तरी त्यामुळे ‘आपला धर्म चुकीचा आहे, त्याची स्थापना झाली नाही’, असे कुणी म्हणू शकत नाही. त्यामुळे ज्या अनमोल गोष्टी आपल्यापर्यंत पोचल्या आहेत, त्या पुढील पिढ्यांकडे सोपवणे, हे आपले दायित्व आहे.
आपली भारतमाता एक पुण्यभूमी, तपोभूमी आणि धर्मभूमी आहे. धर्म अस्त्वित्वात राहिला, तरच ही धर्मभूमी टिकून राहील. यांसाठी नेमकेपणाने करण्यात येत असलेले प्रयत्न देत आहे. १६ मार्च २०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ असलेल्या गुरु-शिष्य परंपरेचा इंग्रजांकडून नाश आणि गावकर्यांना शिक्षणासह आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी रोजगार निर्मिती’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे दिला आहे.
(भाग २)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/893194.html
श्री. बालसुब्रह्मण्यम् यांचा परिचय

‘चेन्नई, तमिळनाडू येथील श्री. बालसुब्रह्मण्यम् ‘ब्रुक फील्ड इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड’चे या आस्थापनाचे संचालक आणि प्रवर्तक (प्रमोटर) आहेत. ते बेंगळुरू (कर्नाटक) येथील ‘स्टॉक ऑफ एक्सचेंज’चे सदस्य आहेत. ‘पार्थसारथी महासभे’चे उपाध्यक्ष आहेत. ते ‘अर्धनारीश्वर ट्रस्ट’ आणि ‘सरस्वती शैक्षणिक न्यासा’चे विश्वस्तही आहेत. ते ‘एकल अभियान’च्या दक्षिण फ्रान्सचे अध्यक्ष आहेत.
६. १ लाख एकल शाळांच्या माध्यमातून देशभरातील मुलांवर भारतीय संस्कृतीचे संस्कार
आम्ही एक नवीन पद्धत चालू केली आहे. आम्ही मंदिरासारखी एक गाडी सिद्ध केली आहे. त्यात स्थानिक देवतेची मूर्ती ठेवली आहे. त्या देवतेची पूजा केली जाते. ती गाडी जवळपासच्या प्रत्येक ३० गावांमध्ये जाते आणि मासभर फिरते. प्रत्येक गावात पूजा केली जाते. त्यामुळे तेथील भक्त जोडून रहातात.
आपल्याकडे अनेक शतकांपासून हिंदु संस्कार हे वारसा म्हणून चालत आले आहेत. आज ते आपल्या अंतर्गत स्थापन करणे, हे एक महत्त्वाचे कार्य आहे. आपल्यासाठी हे एक मोठे आव्हान असले, तरीही आपल्याला कुठल्याही परिस्थितीत ते करायचेच आहे. त्यासाठी आपण एखाद्या शाळेत जाऊन लहान लहान खेळातून मुलांना शिकवू शकतो. माझ्याकडे एक पुस्तक आहे. त्यावर आम्ही कार्यशाळा घेतो. कोणत्याही शाळेत ही कार्यशाळा घेता येईल. आमच्या एकल शाळा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून आसामपर्यंत चालवल्या जातात. आमच्याकडे १ लाख शाळा होत्या. कोरोना महामारी पसरल्यावर या सर्व शाळा बंद कराव्या लागल्या होत्या. कोरोना महामारी गेल्यानंतर आम्ही पुन्हा शाळा चालू केल्या. अनुमाने ७० सहस्र मुले या शाळांमध्ये येतात. त्यात वाढ करणार आहोत. आपल्यावर हिंदु संस्कारांचे मुख्य दायित्व आहे आणि आम्ही ते निश्चितपणे निभावणार आहोत.
७. भारतीय संस्कृती टिकवण्यात आश्रमांचे महत्त्व
एवढे दीर्घकाळ कार्य करण्यासाठी आमच्या २ प्रमुख संस्था आहेत. हिंदु मंदिरांमुळे आपले हिंदु संस्कार टिकून रहात होते; परंतु दुर्दैवाने या मंदिरांचे नियंत्रण सरकारच्या हातात गेले. तेव्हापासून हिंदु समाजाला धर्मशिक्षण मिळत नाही. विशेषतः तमिळनाडूमध्ये हिंदुविरोधी राज्य सरकार आहे. त्यामुळे आम्हाला थोडेसे कठीण जात आहे. आमच्या आश्रमाने अत्यंत मोठी भूमिका बजावली आहे. चिन्मय मिशनमध्ये बालविहार उपक्रम आहे. सर्व ठिकाणी या आश्रमाने फार मोठे कार्य केले. मंदिराच्या तुलनेत आश्रमाचे महत्त्व अधिक असते. सर्वसामान्य व्यक्ती मंदिरात गेली असेल आणि तिला काही प्रश्न असतील, तर मंदिरातील मूर्तीकडून मार्गदर्शन घेऊ शकत नाही. तिच व्यक्ती थोर पुरुष असलेल्या आश्रमात गेली, तेथे तिला काहीतरी मार्गदर्शन मिळू शकेल. त्यामुळे आजच्या काळातही आश्रमाचे हे एक मोठे दायित्व आहे.
८. संत-महात्म्यांच्या अस्तित्वाने गावामध्ये आमूलाग्र परिवर्तन
तमिळनाडूच्या जवळ एका ठिकाणी एक स्वामीजी काही दिवस येऊन राहिले. त्यांनी तेथे आश्रम बनवला. तेथे पूर्वी ख्रिस्ती लोक उघडपणे हिंदूंचे धर्मांतर करायचे. तेथील लोक सकाळी ९-१० वाजता उठायचे. कुणीही मंदिरात जात नव्हते. स्वामीजींनी हे पाहिले. त्यांनी तेथे ६-७ नवीन मंदिरे स्थापन केली. ज्या महिला सकाळी १० वाजेपर्यंत झोपून उठत नव्हत्या, त्या आता सकाळी ६ वाजता उठून नियमितपणे त्यांच्या घरापुढे रांगोळ्या घालू लागल्या आहेत. अशा प्रकारे त्या गावाचे संपूर्ण वातावरण पालटले. त्या गावातील मुले वेदांचे उच्चार करू लागले. ती मुले प्रतिदिन वेद पठण करतात आणि श्लोक म्हणतात. असा परिणाम गावात एक महात्मा राहिल्याने होतो. त्यामुळे आपल्या समाजात पुष्कळ प्रमाणात असे महात्मा निर्माण होणे आवश्यक आहे. आपलीही मुले महात्मा बनली पाहिजेत. आपल्या समाजात जेवढे संत आणि महात्मा यांची संख्या वाढेल, तेवढे हिंदु संस्कार टिकून रहातील अन् वाढतील. सर्व आध्यात्मिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी मिळून हे महान कार्य केले पाहिजे. आपण कोणत्याही हिंदुत्वनिष्ठ संस्थेशी जोडून हे कार्य केले, तर महान भारतीय संस्कृती वाचवण्याचे कार्य करू शकतो.’
(समाप्त)
– श्री. बालसुब्रह्मण्यम्, संचालक, ‘ब्रुक फील्ड इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड’, चेन्नई, तमिळनाडू.
विद्यार्थिनींचे मनोगतकरंजो केंद्राशी संबंधित एका विद्यार्थिनीने माहिती देतांना सांगितले, ‘‘मी पोषण वाटिकेशी संबंधित विद्यार्थिनी आहे. आम्हाला पूर्वी जैविक खताविषयी काहीच ठाऊक नव्हते. जेव्हापासून आम्ही करंजो केंद्राशी जोडले गेलो, तेव्हापासून आम्हाला जैविक खताविषयी माहिती झाली. त्यामुळे आमच्यामध्ये पुष्कळ परिवर्तन झाले आले. आता आम्हाला पौष्टिक आहार मिळतो. पूर्वी माझे ‘हिमोग्लोबिन’ अल्प होते. त्यामुळे मला अशक्तपणा जाणवत होता; पण आता अशक्तपणा दूर झाला आहे. याखेरीज आम्हाला चांगले पैसेही मिळतात. आता आम्ही पोषण वाटिका वाढवत आहोत. त्यामुळे आमच्या घराला हातभार लागेल.’’ काश्मीरमधील एका विद्यार्थिनीने सांगितले, ‘‘हे कार्य करतांना आम्हाला पुष्कळ अडचणी आल्या. काश्मीरची परिस्थिती पूर्वी पुष्कळ वाईट होती. आमच्यावर दगडफेक होत असे. अशा परिस्थितीत तेथे कार्य करणे कठीण होते. भरकटलेल्या मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी त्यांना चांगली शिकवण देण्याचे आम्ही ठरवले. दंगली केल्याने त्यांचीच हानी होते, हे त्यांना समजत नव्हते. ते आम्हाला कोणत्या दृष्टीकोनातून पहातात, हेही आमच्या लक्षात येत नव्हते. काही नकोशा गोष्टी पसरत होत्या. ख्रिस्तीकरणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत होता. अशा प्रकारे अनेक अडचणी आमच्या समोर होत्या. असे असतांनाही आम्ही निकराने लढा दिला. आम्हाला वाटत होते की, आपल्याला समाजाकडून ज्या चांगल्या गोष्टी मिळाल्या, त्या आपल्या मुलांना शिकवल्या पाहिजेत. त्याच गोष्टी काश्मीरमधील मुलांनाही शिकवल्या पाहिजेत. भगवंताने आम्हाला साहाय्य केले आणि आम्ही काही मर्यादेपर्यंत यशस्वीही झालो. |