डॉ. अमित थढानी हे गेली २५ वर्षे मुंबई आणि नवी मुंबई येथे व्यवसाय करणारे प्रसिद्ध ‘जनरल सर्जन’ (शल्यविशारद) आहेत. ते ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या चेंबूर शाखेचे माजी अध्यक्ष आहेत आणि अनेक डॉक्टरांच्या संस्थांचे प्रमुख सदस्य आहेत. ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी भारत आणि नेपाळ येथील अनेक आपत्तीग्रस्त भागात ११ सहस्र रुग्णांवर विनामूल्य उपचार केले आहेत. ते ‘ऑल डॉक्टर म्युझिकल बँड’मध्ये गिटार वाजवतात आणि मोकळ्या वेळेत सेंद्रिय शेती करतात.
डॉ. थढानी यांनी ‘पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना गुंतवण्याचे षड्यंत्र’ हा विषय विविध व्यासपिठांवरून अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला, तसेच ‘हिंदु आतंकवाद’ या खोट्या काल्पनिक सूत्राचा त्यांनी सडेतोड प्रतिवाद केला आहे. या विषयावर जागरूकता निर्माण करण्याचे कार्य ते विविध व्यासपिठांवरून करत आहेत आणि पुरोगाम्यांनी मांडलेल्या काल्पनिक कथांचा विरोध करत आहेत. डॉ. थढानी हे मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात असून त्याविषयी सामाजिक जागरूकता निर्माण करण्याचे कार्य करत आहेत. अशा विविध क्षेत्रांत कार्य करणार्या डॉ. अमित थढानी यांच्याविषयीची माहिती जाणून घेऊ.

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
१. वैद्यकीय आणि सामाजिक कार्यातील योगदान

डॉ. अमित थढानी हे निष्णात शल्यविशारद असून गेली २५ वर्षे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ते ‘पी.इ.एच्.एल्. सर्व्हिसेस’ या स्वयंसेवी संस्थेचे विश्वस्त आहेत. डॉ. थढानी आणि त्यांच्या सहकार्यांनी चिन्मय मिशन, शांतीकुंज आश्रम आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांसारख्या संघटनांसमवेत उत्तराखंड, नेपाळ, चेन्नई आणि महाराष्ट्र येथील नैसर्गिक आपत्तीमुळे हानी झालेल्या भागात ११ सहस्र रुग्णांवर विनामोबदला उपचार केले आहेत. डॉ. थढानी यांनी महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांतील आदिवासी बांधवांसाठी वैद्यकीय शिबिरे आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी शासकीय अन् धर्मादाय खासगी रुग्णालयांच्या साहाय्याने विनामूल्य वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले आहे. स्वतःच्या संस्थेच्या वतीने ते ५०० बालकांच्या शिक्षणाला साहाय्य करत असून त्यांच्या संस्थेच्या योजनांचा लाभ सहस्रो लाभार्थी घेत आहेत. डॉ. थढानी यांची संस्था लखनौ (उत्तरप्रदेश) येथे लैंगिक अत्याचाराने पीडित झालेल्या लहान मुला-मुलींसाठी कौशल्य विकास कार्यक्रम चालवते. याच समवेत संस्थेच्या विविध संघटनांमध्ये बाल आणि महिला यांच्या सुरक्षेसंदर्भात कार्यक्रम राबवण्यात येतात.

| Dr Amit Thadani busts the myth of doctors ‘looting’, explains failure of Ayushman Bharat
(सौजन्य : Vaad) |

२. दाभोलकर हत्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना अकारण गोवण्यात आल्याप्रकरणी पुस्तकाच्या माध्यमातून वाचा फोडणे
दाभोलकर हत्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना अकारण गोवण्यात आल्याचे षड्यंत्र डॉ. थढानी यांनी जगासमोर आणले. याविषयी त्यांनी एक पुस्तक लिहिले आणि त्यात समाजातील सर्वच स्तरांपर्यंत हिंदूंची भूमिका मांडली.
| सनातन संस्था के विरुद्ध राजनैतिक षड़यंत्र | The Rationalist Murders | Amit Thadhani | Jamboo Talks |
‘दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित वारंवार पालटत आहेत’, हे लक्षात आल्यावर डॉ. थढानी यांनी या प्रकरणाचा अत्यंत सखोल आणि चिकित्सात्मक अभ्यास केला. ‘या प्रकरणात गोवण्यात आलेले हिंदुत्वनिष्ठ आणि सनातन संस्थेचे साधक निर्दाेष असून त्यांच्या विरुद्ध कोणतेही पुरावे नसतांना त्यांना यात केवळ द्वेषबुद्धीने अडकवण्यात आले आहे’, असे त्यांच्या लक्षात आले. दाभोलकर प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पोलिसांच्या सांगण्यानुसार वेगवेगळ्या लोकांना मारेकरी म्हणून ओळखले होते, तसेच संशयितांच्या रेखाचित्रांतही पालट करण्यात आले होते. हिंदुत्वनिष्ठ ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या’ला विरोध करत होते. त्या संदर्भातील ७ वर्षांपूर्वीची संगणकीय पत्रे शोधून काढण्यात आली आणि ‘दाभोलकरांवर लक्ष ठेवून त्यांची हत्या करण्यात आली’, अशा प्रकारचे आरोप करण्यात आले.
‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये ?’ पुस्तकाविषयीची भूमिका
डॉ. दाभोलकर-कॉ. पानसरे हत्यांसंबंधी प्रकाशित माहिती, आरोपपत्रे अन् न्यायालयीन आदेश यांचे पुस्तक एक विस्तृत संशोधन आहे. हत्या झालेल्या नास्तिकतावाद्यांचा एक आणि हत्येचा आरोप झालेल्या संस्थांच्या सदस्यांचा दुसरा पक्ष आहे. डॉ. थढानी यांनी अन्वेषणाचे तटस्थ सत्यशोधन केल्याने अन्वेषण यंत्रणांचे अपयश आणि पोलिसी अन्वेषणावरील राजकीय प्रभाव यांवर पुस्तक भाष्य करते. खरे आरोपी न पकडले गेल्यास सीबीआयसारखी सर्वोच्च अन्वेषण संस्था कशी अन्यायकारक कृत्ये करते, हे लक्षात येते. डॉ. थढानी यांनी दोषींना शिक्षा आणि निरपराध्यांच्या संरक्षणार्थ पोलीस दले आणि न्यायिक प्रक्रिया यांच्यातील सुधारणांसाठी पाठपुरावा केला आहे.
या प्रकरणातील ३ संशयितांना न्यायालयाने निर्दाेष मुक्त केले आहे, तसेच मुंबई उच्च न्यायालयात ज्या २ संशयितांवर खटला चालू आहे, तेही यातून लवकरच मुक्त होतील, अशी आशा आहे. डॉ. थढानी यांनी याविषयी ‘द रॅशनॅलिस्ट मर्डर’ नावाचे मराठी आणि इंग्रजी भाषेत पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी या प्रकरणाचे १० सहस्र पानांचे आरोपपत्र, विविध न्यायालयीन आदेश, सीबीआयमधील अज्ञात सूत्रांच्या आधारे वृत्तपत्रांनी दिलेली शेकडो खोटी वृत्ते आणि त्यातून हे प्रकरण भरकटवण्याचे झालेले प्रयत्न यांविषयी सूत्रबद्ध विवेचन केले आहे.
३. दर्शनाच्या ‘ऑनलाईन’ आरक्षणातील भ्रष्टाचाराकडे मंदिर व्यवस्थापनाच्या दुर्लक्षाविषयी न्यायालयीन याचिका करणे

कोरोना महामारीच्या कालावधीत मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रवेशासाठी मूल्य आकारण्यात येत होते. त्या वेळी डॉ. थढानी यांनी मंदिराच्या विरोधात याचिका प्रविष्ट (दाखल) करून हा चुकीचा पायंडा थांबवला. कोरोना महामारीच्या काळात शासनाने या मंदिरात प्रत्यक्ष दर्शनाला बंदी घातली आणि प्रवेशासाठी संगणकीय ‘ॲप’वर नोंदणी अनिवार्य केली. यामुळे मंदिराच्या बाहेर उभे असलेले दलाल या ‘ॲप’मधील बहुतांश जागा अडवून ठेवत. त्यामुळे सामान्य भाविकाला मोठी रक्कम देऊनच मंदिरात प्रवेश मिळवावा लागे. हे सर्व मंदिर व्यवस्थापन आणि सुरक्षा कर्मचारी यांच्या डोळ्यांदेखत घडत होते. डॉ. थढानी यांनी याविषयी याचिका प्रविष्ट केली. त्यानंतर मंदिर विश्वस्तांनी भाविकांना मंदिरात थेट प्रवेश देण्यास आरंभ केला, तसेच ‘ॲप’चा गैरवापर करून बहुतांश जागा अडवून धरण्याच्या कुप्रथेवरही निर्बंध घातले.
Siddhivinayak temple trust has come out with an app for online booking of darshan in Covid times. If you want to visit, prior online booking is mandatory. Of course like all govt controlled temples, there’s a scam going on in online darshan too. Read this thread. 1/n pic.twitter.com/8ZclCqdd4a
— Amit Thadhani (@amitsurg) November 30, 2021
डॉ. थढानी यांनी भ्रष्टाचाराविषयी सामाजिक माध्यमांवर आवाज उठवला. त्यानंतर या विषयावर वर्तमानपत्रांमध्ये २-४ लेखही प्रकाशित झाले. परिणामी मंदिर व्यवस्थापनाने मंदिर दर्शनासाठी नवीन कार्यपद्धत चालू केली. त्यानुसार दर्शनासाठीचे ‘ऑनलाईन’ आरक्षण केवळ एक दिवस अगोदर होईल, अशी कार्यपद्धत केली.
मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपति मंदिरासह सरकारीकरण झालेल्या मंदिरांविषयी डॉ. अमित थढानी यांचे विचार !

‘प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपति मंदिराच्या विश्वस्तांमध्ये आपापसांत मतभेद आहेत. त्यामुळे ते मंदिराचे व्यवस्थापन करण्यात असमर्थ आहेत’, या कारणावरून वर्ष १९८० मध्ये महाराष्ट्र सरकारने एक अध्यादेश काढला आणि त्याचे कायद्यात रूपांतर करून हे मंदिर सरकारी नियंत्रणात घेतले. त्यानंतर त्या न्यासाला ‘श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट’ असे नाव देण्यात आले. कायद्यानुसार मंदिरातील प्रत्येक विश्वस्त हा हिंदु असायला हवा; मात्र तसे तेथे दिसून येत नाही. मंदिरातील कर्मचार्यांना वेतन मिळते. प्रत्येक विश्वस्त हा राजकीय नेता आहे. मंदिराचा पैसा हा मंदिराचा विकास, पूजा, भूमी आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी व्यय करायला हवा. प्रत्यक्षात तसे होत नाही. मंदिराचा पैसा शाळा, रुग्णालये चालवण्यासाठी आणि धर्मादाय संस्थांना दिला जातो. मिरज येथे सिद्धिविनायक कॅन्सर रुग्णालयाला याच मंदिरातून पैसा दिला जातो. मंदिराच्या कारभारात प्रत्येक टप्प्यावर चुका आहेत.
श्री सिद्धिविनायक मंदिरातील आर्थिक व्यवहारांची माहिती आम्ही माहिती अधिकारातून घेऊन तेथील भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. मंदिराचा पैसा मुसलमानांही दिला जातो. ज्यांची श्रद्धा नाही, त्यांना पैसा का दिला जातो ? ‘मंदिरांचे विश्वस्त म्हणून केवळ राजकीय नेत्यांची निवड न करता पात्र असलेल्या गुणवान व्यक्तीची नेमणूक करावी, मंदिर सरकारीकरणातून मुक्त करून भक्तांच्या स्वाधीन करावे, तसेच मंदिरांचा निधी केवळ हिंदु, हिंदु धर्म आणि मंदिर यांच्यासाठीच उपयोगात आणला जावा’, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांसमवेत संघटितपणे कार्य करण्यात प्रयत्नरत आहे.
– डॉ. अमित थढानी
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !