Khalid Hanafi On Non-Muslims : (म्हणे) ‘हिंदु आणि शीख यांच्यासह मुसलमानेतर हे प्राण्यांपेक्षा वाईट !’ – तालिबानी मंत्री

अफगाणिस्तानधील तालिबानी सरकारच्या मंत्र्याचे विधान

खालिद हनाफी

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानातील तालिबान सरकारमधील मंत्री खालिद हनाफी याने ‘हिंदु, शीख आदी मुसलमानेतर हे प्राण्यांपेक्षा वाईट आहेत’, असे विधान केले आहे. हनाफी यानेच अफगाणिस्तानात महिलांचे शिक्षण आणि नोकर्‍या यांवर बंदी घालण्याची घोषणा केली होती.

या प्रकरणी ब्रिटनमधील अफगाणी शीख आणि हिंदू स्थलांतरितांच्या प्रतिनिधीने खालिद हनाफी याच्या विधानाचा निषेध करत म्हटले की, कुणालाही दुसर्‍या धर्माचा अपमान करण्याचा अधिकार नाही आणि अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे अफगाणिस्तानात उरलेल्या शीख आणि हिंदू यांना आणखी धोका निर्माण होऊ शकतो. अनेक लोकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या भीतीने देश सोडण्यास भाग पाडले जाऊ शकते.

संपादकीय भूमिका

तालिबान्यांकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ? भारतात मुसलमानांवर कथित आक्रमण होण्यावरून टीका करणारी इस्लामी देशांच्या संघटना यावर मौन बाळगून का आहेत ?