जळगाव – येथील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची डंपरद्वारे हत्या करण्यात येईल. जिल्ह्यात दंगली घडवण्यात येतील. जळगावचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भ्रष्ट असल्याने त्यांना निलंबित करण्यात यावे, अशा स्वरूपाचाचे धमकीचे ईमेल मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. ते जळगावचे जिल्हाधिकारी आणि पोलीस यांना पाठवण्यात आले आहेत.
‘या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षकांना अन्वेषणाच्या सूचना देण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल’, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. जळगाव जिल्हाधिकार्यांसह विविध पोलीस अधिकार्यांना जिवे मारण्याविषयी ३- ४ वेळा धमकीचे मेल मिळाले आहेत; पण त्यांतील भाषा बघता त्यात विशेष गांभीर्य दिसून येत नाही; मात्र तरीही या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.