खडवली (कल्याण) येथील वसतीगृहात २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार !

  • आश्रमशाळेतील मुलांना बेदम मारहाण !

  • ५ जणांवर गुन्हा नोंद

प्रतीकात्मक छायाचित्र

ठाणे – कल्याण तालुक्यातील खडवली भागातील खासगी वसतीगृहात २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आले, तर तेथील आश्रमशाळेतील मुलांना अनेक दिवसांपासून मारहाण केली जात असल्याचेही उघडकीस आले. जिल्हा महिला बाल कल्याण समितीकडून पहाणीच्या वेळी हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी खासगी आश्रमशाळा चालवणारा संचालक बबन शिंदे, त्यांचा मुलगा प्रसन्न शिंदे, पत्नी आशा शिंदे, शिक्षिका दर्शना पंडित आणि कामगार प्रकाश गुप्ता अशा ५ जणांना अटक केली आहे.

या वसतीगृहात १२ ते १५ मुले रहातात. निराधार मुलांवर अत्याचार करणार्‍या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

संपादकीय भूमिका 

या प्रकरणातील संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी !