कुडाळ – मुंबई-गोवा महामार्गावर झाराप येथील पेट्रोलपंपाच्या जवळ १२ एप्रिलच्या रात्री गांजाचे सेवन करतांना विनायक रामचंद्र पाटील (वय ३४ वर्षे, मूळ रहाणार चंदगड) यांना पोलिसांनी अटक केली. पाटील हे सावंतवाडी तालुक्यातील तांबोळी येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे समजते. कुडाळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुबोध साबाजी मळगावकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (विद्यार्थ्यांना मारहाण, विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन, मद्य सेवन, गांजा सेवन, अशा अनैतिक कृती काही शिक्षकांकडून घडण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा शिक्षकांमुळे ‘देशाची भावी पिढी घडवणारे शिक्षक’ या विशेषणावरून समाजाचा विश्वास उडाल्यास आश्चर्य ते काय ! )