कीव (युक्रेन) – रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र आक्रमणात युक्रेनमधील ‘कुसुम’ या भारतीय औषध आस्थापनाच्या गोदामाला आग लागली. भारतातील युक्रेनच्या दूतावासाने आरोप केला आहे की, ‘भारताशी विशेष मैत्री असल्याचा दावा करणारा रशिया जाणूनबुजून भारतीय आस्थापनांवर आक्रमण करत आहे.’ या आक्रमणावर भारत आणि रशिया यांनी अद्याप कोणतेही विधान केलेले नाही.