सरकारने विनामूल्य योजना बंद कराव्यात ! – भाजप आमदार सुरेश धस

सुरेश धस, भाजप आमदार

अहिल्यानगर – गरिबांना विनामूल्य अन्नधान्य मिळत असल्याने शेतावर काम करण्यासाठी कामगार मिळत नाहीत. शेतकर्‍यांना कामगारांच्या घरी जाऊन विनंती करावी लागते. शिवाय सरकारकडून वाटप होणार्‍या विनामूल्य धान्याचा आणि इतर काही योजनांचा गैरवापरही होत आहे, त्यामुळे सरकारने अशा विनामूल्य योजना बंद केल्या पाहिजेत, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात का येत नाही ? – संपादक) संगमनेर येथे एका कार्यक्रमासाठी आले असतांना सुरेश धस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सुरेश धस पुढे म्हणाले की, मजुरीचे काम करण्यास परराज्यातून कामगार आणण्याची वेळ आली आहे. स्थानिक कामगारांचा रोजगार भविष्यात अल्प होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.