मुंबई विद्यापिठाच्या बनावट ‘फेसबूक पेज’द्वारे विद्यार्थ्यांची प्रवेशप्रकिया चालू !

मुंबई – मुंबई विद्यापिठाचे बनावट ‘फेसबूक पेज’ सिद्ध करून त्याद्वारे विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रकिया चालू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार लक्षात येताच मुंबई विद्यापिठाने या विरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.  याविषयी मुंबईच्या सायबर गुन्हेगारीविरोधी पथकाकडून नागरिकांना सावध रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘https://www.facebook.com/share/1ALkntvz9o/’ या लिंकवर मुंबई विद्यापिठाची बोगस प्रवेशप्रक्रिया चालू करण्यात आली होती. प्रवेशासाठी नाव, भ्रमणभाष आणि ई मेल पत्ता यांची नोंद केल्यावर अचानक ‘https://www.markmonitor.com/online-com/’ हे संकेतस्थळ उघडत होते. मुंबई विद्यापिठाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हे संकेतस्थळ बंद केले आहे. मुंबई विद्यापिठातील प्रवेशप्रक्रियेची माहिती ‘www.mu.ac.in’ या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येईल, असे मुंबई विद्यापिठाकडून सांगण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

वाढत्या सायबर गुन्ह्यांचे पोलीस आणि नागरिक यांच्यापुढे मोठे आव्हान !