ठाणे येथे १७ एप्रिलला ‘पितांबरी उद्योग समूहा’चे डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा नागरी सत्कार !

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

ठाणे – ‘पितांबरी उद्योग समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांना नुकतीच पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापिठाकडून ‘डी. लिट्.’ ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली. यानिमित्त विविध संस्था आणि हितचिंतक यांच्या ‘नागरी अभिवादन सत्कार समिती’च्या माध्यमातून १७ एप्रिल या दिवशी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कारप्रसंगी मानपत्राचे वाचन आणि डॉ. प्रभुदेसाई यांच्यावरील स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या वेळी लेखा परीक्षक (सीए) संजीव ब्रह्मे, अरुंधती भालेराव, अमोल धर्मे आणि नितीन बोरसे उपस्थित होते.

प्रतिकात्मक चित्र

ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात १७ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ ‘पद्मविभूषण’ डॉ. अनिल काकोडकर, अध्यात्माचे उपासक आणि सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे, सनातन संस्थेच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी आणि ठाणेकर नागरिक उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘नागरी अभिवादन सत्कार समिती’च्या वतीने करण्यात आले आहे.